Dhule Tree Cutting Case : झाडांची कत्तल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार! अंतिम निर्णयासाठी फाइल आयुक्तांकडे

Tree Cutting
Tree Cuttingesakal
Updated on

Dhule Tree Cutting Case : कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता, माय पॉवरमध्ये तुळशीरामनगर येथील उद्यानातील तब्बल ५२ झाडांची कत्तल करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. या संदर्भात मनपा आयुक्तांकडे फाइल ठेवली असून, आयुक्त त्यावर लवकरच निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.

केंद्र सरकारच्या अमृत अभियानांतर्गत हरितक्षेत्र विकासासाठी प्राप्त निधीतून धुळे महापालिकेने शहरातील २० उद्यानांमध्ये हरितक्षेत्र विकासाची कामे केली.

यात तुळशीरामनगर येथील उद्यानाचाही समावेश आहे. या उद्यानात हरितक्षेत्र विकासांतर्गत काम झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षराजी बहरली होती. (tulshiram nagar garden case will be registered against those who kill trees dhule news)

मात्र, २२ ऑगस्टला या उद्यानातील वृक्षांवर निर्दयपणे कुऱ्हाड चालविली गेली. यात तब्बल ५२ झाडांची कत्तल झाल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार कानावर आल्याबरोबर महापालिकेचे वृक्ष अधिकारी रविकिरण पाटकरी यांनी उद्यानात धाव घेत वृक्षतोड करणाऱ्यांना याबाबत जाब विचारला, तसेच त्यांच्याकडील साहित्य जप्त केले.

घटनेचा पंचनामाही केला. उद्यानात वृक्षतोड करणाऱ्यांकडे इलेक्ट्रिक करवतीसह इतर साहित्य होते, ते श्री. पाटकरी यांनी जप्त केले. तसेच घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुन्हाच दाखल होणार

तुळशीरामनगर येथील उद्यानात कोणताही परवानगी न घेता ५२ झाडे तोडणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तशी प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली. यासंबंधीची फाइल आयुक्तांकडे ठेवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात मनपा आयुक्तांची बदली झाली तसेच नवीन आयुक्त रुजू झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Tree Cutting
Dhule News : शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी ‘भविष्यवेधी शिक्षण प्लस’; सीईओ शुभम गुप्ता यांची संकल्पना

त्यामुळे संबंधित फायलीबाबत अद्याप नवनियुक्त आयुक्त अमिता दगडे-पाटील यांनी निर्णय घेतलेला नाही. तो घेतल्यानंतर लगेचच वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. वृक्षतोडीच्या या प्रकरणात दोघांची नावे समोर आल्याचे समजते. यातील एकाने झाडे तोडण्यास सांगितले, तर दुसऱ्याने झाडे तोडली आहेत.

बेकायदा कामाला पाठिंबा कसा?

एकीकडे केंद्र, राज्य शासन विविध अभियानांच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनासाठी पर्यायाने वृक्षारोपण, वृक्षांचे जतन, संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहे. विशेषतः महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी राबत आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रम घेत आहे, आवाहन करत आहे.

दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून उभ्या राहिलेल्या हरितक्षेत्रावर सर्रास कुऱ्हाड चालविली जाते. संबंधित हरितक्षेत्रामुळे जंगल निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने, उद्यानात काही गैरप्रकार होत असल्याने झाडे तोडली गेल्याचे सांगण्यात येते व याला काही नागरिक व काही लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा असल्याचे दिसते. वास्तविक हरितक्षेत्रामुळे काही अडचणी होत्या तर त्या कायदेशीर पद्धतीने, परवानगी घेऊन सोडविता आल्या असत्या मात्र अशी कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

Tree Cutting
Dhule Crime News : इच्छेविरुद्ध गर्भपात करताना युवतीचा मृत्यू; डॉक्टरसह दोघांविरोधात गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.