शिरपूर (जि. धुळे) : येथील श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात भरवलेल्या पशुबाजारात गुरांच्या खरेदी-विक्रीतून आजअखेर सुमारे सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
विशेषत: बैल आणि घोड्यांना (Horse) अधिक मागणी असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. (Turnover of quarter crore in Shirpur cattle market dhule news)
पशुबाजारात अश्वबाजार हे खरेदीदारांसह नागरिकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. सोमवारी (ता. १३) तेथे यंदाच्या बाजारातील सर्वाधिक मोठ्या रकमेचा व्यवहार झाला. अजहरखान इकबाल मोहंमद (रा. धौरातांडा, ता. बरेली, उत्तर प्रदेश) यांच्या मालकीचा उमदा अश्व शहादा येथील विशाल लक्ष्मण अहिरे यांनी अडीच लाख रुपये किमतीला खरेदी केला.
अहिरे यांच्याकडे अश्व सुपूर्द करताना बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, यात्रा उपसमितीचे सभापती अविनाश पाटील, संचालक राजकपूर मराठे, नरेश पाटील, राजेंद्र पाटील, मोहन पाटील, अशोक पाटील, शिवाजी वाळुंजकर, युवराज जैन आदी उपस्थित होते.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
सव्वा कोटीची उलाढाल
दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पशुबाजार बंद होता. त्यामुळे गुरांच्या खरेदी-विक्रीतून होणारी मोठी उलाढाल थंडावली होती. यंदा बाजार समितीमध्ये एक हजार १३२ गुरांची आवक झाली असून, त्यातील ७३८ गुरांची विक्री झाली आहे.
२११ पैकी १११ अश्वांची विक्री झाली आहे. पंजाब, सिंध, मारवाड, काठेवाड प्रांतातून उमदे अश्व दाखल असून, चांगल्या जातीचे बैलही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गुरांच्या खरेदी-विक्रीतून एकूण सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.