Dhule News : नाशिक व गुजरात राज्यातील अनेक गावांतून दुचाकींची चोरी करून साक्री तालुक्यात विक्री करणाऱ्या टोळीतील दोन संशयितांना पिंपळनेर (ता. साक्री) पोलिसांनी गजाआड केले.
संशयितांकडून चोरीची २० वाहने हस्तगत केली. तपासात आणखी काही संशयित आणि वाहनांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सोमवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत वर्तवली.(Two arrested in two wheeler theft racket 20 vehicles seized police involved in Pimpalner operation honored with certificate of honour Dhule News)
पोलिस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेस अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, साक्रीचे उपअधीक्षक साजन सोनवणे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी उपस्थित होते. यासंदर्भात पुरक माहिती देणारे पिंपळनेरचे पोलिस कर्मचारी राकेश बोरसे यांचा दहा हजारांच्या निधीतील पुरस्कार देत गौरव झाला.
पिंपळनेर परिसरातील एक तरुण वेळोवेळी वेगवेगळ्या दुचाकी वापरतो. त्याच्या राहणीमानात बदल पडल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे श्री. बोरसे यांनी ही माहिती श्री. पारधी यांना दिली. नंतर त्यांनी शामिल पांडू बागूल (रा. शेंदवड, ता. साक्री) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यातून दुचाकी चोरीचे रॅकेट उघडकीस आले.
बागूल याने रोशन सुरेश गायकवाड (रा. वीरगाव, ता. बागलाण, जि. नाशिक) याच्या मदतीने १८ एप्रिलला देशशिरवाडे (ता. साक्री) येथून एका शेतकऱ्याची दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे बोपखेल (ता. साक्री) येथून दोघांनी दुचाकी चोरली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
साक्री पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिघावे, नाशिक ग्रामीण भागातील छावणी, मालेगाव कॅम्प, वडनेर, सटाणा परिसरातही दुचाकी चोरल्याची माहिती संशयिताने दिली. याप्रकरणी पिंपळनेर पोलिस पथकातील भाईदास मालचे, लक्ष्मण गवळी, कांतिलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, अतुल पाटील, भास्कर सूर्यवंशी, राकेश बोरसे, प्रणय सोनवणे, पंकज माळी, विजयकुमार पाटील, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, दावल सैंदाणे, नरेंद्र परदेशी यांनी संशयितांकडून सव्वासहा लाखांच्या विक्रीतील २० दुचाकी हस्तगत केल्या. त्यामुळे या कारवाईत सहभागी प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला श्री. बारकुंड यांनी सन्मानपत्रांचे वितरण केले.
"ज्या नागरिकांच्या दुचाकींची चोरी झाली आहे, त्यांनी कागदपत्रांसह पिंपळनेर पोलिस ठाण्यात दुचाकीची खात्री करावी. वाहनधारकाने कागदपत्रांची खातरजमा केल्याखेरीज अल्प किमतीत दुचाकी किंवा अन्य कोणतीही वस्तू खरेदी करू नये. याबाबत संशयितांची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यास द्यावी."
- संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक, धुळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.