Nandurbar Bribe Crime : येथील पंचायत समितीतील एकाचे सातव्या वेतन आयोगाचे थकीत बिल काढून देण्यासाठी सात हजारांची लाच स्वीकारताना कनिष्ठ सहाय्यक दादाभाई पानपाटील यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी (ता. ८) पकडले.
दुसरे कनिष्ठ सहाय्यक सुखदेव भुरसिंग वाघ यांनीही लाचेची मागणी केली होती, प्रत्यक्ष सापळ्यावेळी ते नव्हते. मात्र, त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two junior assistants were arrested in bribe crime Nandurbar news)
सातारा येथून आंतरजिल्हा बदलीने नंदुरबार पंचायत समितीत आलेल्या कर्मचाऱ्याकडून जुलै २०२१ ते मे २०२३ या कालावधीतील त्यांची पगारवाढ व सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्त्यांचे बिल मंजूर करण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक दादाभाई पानपाटील आणि कनिष्ठ सहाय्यक सुखदेव वाघ यांनी सात हजारांची लाचेची मागणी केली होती.
संबंधिताने ती आज देण्याचे निश्चित करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविले. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान वाघ यांनी हा सापळा रचला होता. पोलिस निरीक्षक माधवी वाघ यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
पंचायत समिती आवारात डाव्या बाजूस असलेल्या वाहन पार्किंगजवळील लोखंडी गेटजवळ ठरल्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याने कनिष्ठ सहाय्यक पानपाटील यांना बोलविले. तेथे सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना पानपाटील यांना पथकाने पकडले.
त्यांच्याकडून लाचेची रक्कम हस्तगत करण्यात आली. दुसरे कनिष्ठ सहाय्यक वाघ यांनीही एक-दोन हजारांची मोघम मागणी केली होती, त्यामुळे दोघांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.