Dhule News : शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने सौंदाणे (ता. धुळे) येथील लोकनियुक्त सरपंच कमलबाई पाटील तसेच, ग्रामपंचायत सदस्य भीमराव पाटील व विकास पाटील यांना अपर आयुक्त नीलेश सागर यांनी अपात्र ठरवले. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कायम ठेवण्यात आला. (Two members disqualified including Sarpanch of Saundane dhule news
२०१८ मध्ये सौंदाणे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. त्यावेळी कमलबाई अमृत पाटील यांची सरपंचपदी तर भीमराव माणिक पाटील व विकास निंबा पाटील यांची सदस्य म्हणून निवड झाली होती. दरम्यान, या तिघांच्या विरोधात चंद्रशेखर विश्वास पाटील यांनी तक्रार केली होती. सरपंच कमलबाई पाटील यांचे सासरे सदा पाटील यांच्या नावावर सिटी सर्व्हे क्रमांक २८५ ही जागा होती.
या जागेच्या शेजारी ग्रामपंचायतीची सिटी सर्व्हे क्रमांक २८४ जागा आहे. या जागेत असलेल्या विहिरीवरून गावाला पाणीपुरवठा होतो. मात्र, विहिरीचा वापर कमी झाल्याने सरपंच कमलबाई पाटील यांचे पती अमृत पाटील यांनी विहीर बुजवून शासकीय जागा ताब्यात घेतली अशी तक्रार चंद्रशेखर पाटील यांनी केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तर सदस्य भीमराव पाटील यांनी निवडणुकीवेळी मिळकतीविषयी खोटे प्रतिज्ञापत्र दिले. तसेच, भावाच्या नावावरील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये राहत असल्याचे स्पष्ट केले होते.
मात्र, ते राहत असल्याची इमारत शासकीय जागेवर व नाल्यात असल्याचे तक्रारीत नमूद होते. तसेच विकास निंबा पाटील हे वडील निंबा गंगाराम पाटील यांच्यासोबत राहतात. त्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अपर आयुक्त श्री. सागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निकाल कायम ठेवत तिघांना अपात्र ठरविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.