Unseasonal Rain : नुकसानग्रस्तांबाबत मुख्यमंत्र्यांकडून 'या' दिवशी होणार मदतीची घोषणा

unseasonal rain crop damage dhule news
unseasonal rain crop damage dhule newsesakal
Updated on

धुळे : वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी मंगळवारी रात्री धुळ्यात दाखल झाले. (unseasonal rain crop damage Announcement of help from Chief Minister on 25 march for victims dhule news)

नंतर ते गुढीपाडवा असूनही बुधवारी (ता. २२) थेट काही शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाची भूमिका मांडली. आनंदखेडे (ता. धुळे) शिवारातील नुकसानग्रस्त भागाची कृषिमंत्री सत्तार यांनी पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. साक्री तालुक्यातही काही ठिकाणी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. कृषिमंत्री सत्तार म्हणाले, की सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे.

जिल्ह्यातील पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाईल. विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनातच शनिवारी (२५ मार्च) मुख्यमंत्री शिंदे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईबाबत घोषणा करतील.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

unseasonal rain crop damage dhule news
Nandurbar News : चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला ठोकल्या बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे आत्महत्या केल्याचा आरोप झाला आहे. त्याबाबत कृषिमंत्री सत्तार म्हणाले, की वीज कंपनीच्या जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे शेतकऱ्याला जीव गमवावा लागला असेल, तर संबंधितांवर कारवाईची मागणी मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करेन.

कृषिमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, अधिकारी वर्ग, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले, जिल्हाप्रमुख मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख विजय अग्रवाल, महानगरप्रमुख संजय वाल्हे, बाळू आगलावे आदी उपस्थित होते.

unseasonal rain crop damage dhule news
Nashik Crime: हज यात्रेच्या नावाखाली टूर्स चालकाकडून फसवणूक अन् जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांना निवेदन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.