Unseasonal Rain News : तळोदा तालुक्यात अवकाळीचा दणका; परिसरात सर्वाधिक घरांचे नुकसान

Rapapur (Taloda): The life of Jairam Thackeray was exposed after the walls and letters of the house were blown away. In the second photo, the fallen roof of the house. In the third photo, a woman looks at the blown-up sheets of a house.
Rapapur (Taloda): The life of Jairam Thackeray was exposed after the walls and letters of the house were blown away. In the second photo, the fallen roof of the house. In the third photo, a woman looks at the blown-up sheets of a house.esakal
Updated on

Nandurbar News : तालुक्यात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे तळोदा शहरासह रापापूर, चौगाव, अमोनी, लक्कडकोट, दलेलपूर, रानमहू, रेवानगर या सातपुड्यालगत असलेल्या गावात एकच धावपळ उडाली.

यात सर्वाधिक नुकसान रापापूर येथे झाले असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. (Unseasonal rain in Taloda Taluka Most of house damage in area Nandurbar News)

काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. दरम्यान, खरिपाची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसला आहे.

तालुक्यातील सातपुडा पर्वताचा पायथ्यालगत असणाऱ्या परिसरात आज (ता.२०) दुपारी वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तळोदा शहरात देखील हवेचा वेग प्रचंड होता. या वादळी पावसाने सर्वाधिक नुकसान रापापूर या गावात झाले आहे.

येथील अनेक घरांचे पत्रे उडाले असून घरातील संसारपयोगी साहित्य उघड्यावर आले आहे. यात जयराम रामसिंग ठाकरे यांचे घरच जमीनदोस्त झाले आहे. त्यांच्या घराचे सर्व भिंती पडल्याने व पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Rapapur (Taloda): The life of Jairam Thackeray was exposed after the walls and letters of the house were blown away. In the second photo, the fallen roof of the house. In the third photo, a woman looks at the blown-up sheets of a house.
Dhule News : विनापरवानगी साठवलेले HTBT कापसाचे बियाणे जप्त

तर दशरथ सोत्या वळवी, पुण्या टेंटग्या वळवी, गणपत रामजी वसावे, हिरालाल पुण्या वळवी, जेमका गुजऱ्या पाडवी, रामसिंग ठाकरे, केनाबाई लक्ष्मण पाडवी, सर्वरसिंग करमसिंग ठाकरे, दिलीप गौऱ्या वसावे या शेतकऱ्यांचे घरांचे व शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

गावातील इतरही अनेक घरांचे व शेतपिकांचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तातडीने पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा गावकऱ्यांची आहे.

"रापापूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यात अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली असून अन्नधान्य देखील भिजले आहे. गावातील विजेचे खांब देखील उन्मळून पडले आहेत. शेतकऱ्यांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून सर्वांना नुकसान भरपाई द्यावी."

- यशवंत ठाकरे, माजी सभापती, पंचायत समिती तळोदा

Rapapur (Taloda): The life of Jairam Thackeray was exposed after the walls and letters of the house were blown away. In the second photo, the fallen roof of the house. In the third photo, a woman looks at the blown-up sheets of a house.
Nashik Crime News : द्वारका बसस्थानकावरून सोन्याचे दागिने लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()