Unseasonal Rain Dhule : ढगांच्या गडगडाटासह पावसाची पुन्हा हजेरी; धावडेत वीज कोसळून बैल ठार

Unseasonal Rain
Unseasonal Rainesakal
Updated on

Unseasonal Rain Dhule : परिसरात मंगळवारी (ता. १८) सकाळपासून आकाशात ढग भरून आले होते. विजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाट सुरू होता. पावसानेही अधूनमधून हजेरी लावली.

मालपूर (ता. शिंदखेडा) येथे संतोषीमातानगरात नारळाच्या झाडावर वीस कोसळली. (Unseasonal Rain reappeared with thunder and lightning and killed bull dhule news)

त्यामुळे झाडावर आगीने पेट घेतला होता. माजी उपसरपंच सावित्रीबाई कोळी यांच्या घरामागील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी धावपळ उडाली होती. सुदैवाने कोणतीही हानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. लगतच असलेल्या सुनील पंडित कोळी यांच्या घराला बारीक तळे गेले. दरम्यान, धावडे (ता. शिंदखेडा) येथे वीज कोसळून बैल ठार झाला.

सकाळ अकराच्या सुमारास धावडे येथील बापू फत्तेसिंग गिरासे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली बैल बांधला होता. सकाळी अकराच्या सुमारास वीज कोसळली. त्यात बैल जागीच ठार झाला.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे शिक्षण आरोग्य समितीचे सभापती महावीरसिंह रावल यांनी शेतात जाऊन शेतकरी गिरासे यांची भेट घेतली. तलाठ्याला संपर्क साधून पंचनामा करण्याचे सांगितले. तलाठी विकास सिंगल यांनी पंचनामा केला आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Unseasonal Rain
Dhule News : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रभूषण परत करावा : महेश घुगे

मालपूर येथे सुनील (अण्णा मिस्तरी) कोळी यांच्या घरातील टीव्ही, फ्रीज, इन्व्हर्टर जळाले आहेत. तलाठी विशाल गारे, पोलिसपाटील बापू बागूल यांनी पाहणी करून प्राथमिक अहवाल पाठविणार असल्याचे सांगितले.

गेल्या चार-पाच दिवसांपासून सोसाट्याचा वारा परिसरात सुरू आहे. सध्या उन्हाळ कांदा काढणीस आला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढणीस सुरवात केली आहे. पावसाळी वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. दर आठवड्याला अवकाळीच्या भीतीने शेतकरी वैतागले आहेत.

काढलेला कांदा किती दिवस झाकून ठेवावा, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तयार कांदा खरेदीसाठी व्यापारी पावसाळ्याच्या खरेदीसाठी येत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे काढलेल्या कांद्याची रास शेतातच करून प्लॅस्टिक कागद झाकून कांदा वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

Unseasonal Rain
Dhule News : अरे व्वा..! केवळ 5 टक्के काम बाकी; एप्रिलअखेर जलवाहिनीची चाचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.