Agricultural Awareness : शेतीविषयी तरुणांमध्ये जनजागृतीचा ध्यास !

Agriculture News : शेतीत काही पिकत नाही, पिकलं तर भाव मिळत नाही या पारंपरिकतेला छेद देत म्हसदी (जि. साक्री) येथील तरुण भूपेश देवरे यांनी शेवग्याच्या शेतीचे एक असामान्य उदाहरण घालून दिले आहे.
Bhupesh Deore's paddy fields flourished in Deur (Dhule district) Shiwar.
Bhupesh Deore's paddy fields flourished in Deur (Dhule district) Shiwar.esakal
Updated on

कोरडवाहू शेती, उत्पन्नाचा भरवसा नाही. त्यामुळे शेती परवडत नाही, अशी नेहमीच ओरड असते. पण, प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर पाणी आणत माळरानावर शेवग्याची शेती फुलविली अन पाहता-पाहता शेवग्याने लाखमोलाची भरारी मिळवू नदिली. अर्थात, यामागे कष्ट, मेहनत आणि नियोजनही तेवढेच महत्त्वाचे आहे.

शेतीत काही पिकत नाही, पिकलं तर भाव मिळत नाही या पारंपरिकतेला छेद देत म्हसदी (जि. साक्री) येथील तरुण भूपेश देवरे यांनी शेवग्याच्या शेतीचे एक असामान्य उदाहरण घालून दिले आहे. पंधरा एकरातून वर्षाकाठी तो ५० लाखांचे निव्वळ उत्पन्न घेत आहे. कोरडवाहू शेती असणाऱ्यांसाठी भूपेश यांची शेवग्याची चित्तरकथा एक प्रेरणास्रोत ठरत आहे. (Obsession with awareness among youth about agriculture)

म्हसदी (ता. साक्री, जि. धुळे) येथील युवा शेतकरी भूपेश सुनील देवरे यांची १२ एकर वडिलोपार्जित व पाच एकर तोड- बटाईची शेती. पण, पाणी नसल्याने उत्पन्नाचा भरवसा रामभरोसेच. पारंपरिक शेती करीत असताना भूपेश यांचे वडील सुनील देवरे यांचे २०११ मध्ये निधन झाले.

त्यामुळे शेतीची जबाबदारी आपसूकच भूपेश यांच्याकडे आली. सततच्या दुष्काळाचा शाप साक्री तालुक्याला लागलेला. अशावेळी शेतीतून सावरणे तसे दिव्यच. भूपेश यांनी मनाशी खूणगाठ बांधत दुष्काळावर मात करण्याचे ठरविले. कमी पाण्यात चांगले उत्पन्न कसे मिळू शकेल, याचा विचार करून त्यांनी शेवगा शेतीची निवड केली.

पण, मार्ग तेवढा सोपाही नव्हता. सुरवातीला या शेतीचा, उत्पन्नाचा, खर्च आणि विपणनाचा त्यांनी अभ्यास केला. अनेकांनी त्यांना हसण्यावारीही नेले. पण, वेगळे काहीतरी करण्याची जिद्द ठेवत भूपेश यांनी वाटचाल सुरू केली. गावापासून चार किलोमीटरवरून पाइपलाईनने पाणी आणण्याचे धाडस केले. शेवग्याला कमी; पण नियमित पाणी लागते म्हणून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याचे त्यांनी ठरविले.

संपूर्ण १७ एकर क्षेत्रात भूपेश यांनी शेवगा लावला. त्यांनी २०१४ पासून पारंपरिक शेतीला छेद देत शेवगा- भाजीपाला शेतीत वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अवघ्या २७ व्या वर्षी शिक्षण अर्धवट सोडून धरलेली शेतीची वाट त्यांना अनुभवाने समृद्ध करून गेली. गावालगत व देऊर (ता. धुळे) शिवारात वडिलोपार्जित १२ एकर क्षेत्र असून, जोड म्हणून पाच एकर क्षेत्र तोड- बटाईने केले आहे.

सर्वच ठिकाणी ओडीसी संकरित शेवग्याच्या वाणाची लागवड केली आहे. लागवडीपासून अवघ्या सहाव्या महिन्यापासून शेवग्याचे उत्पन्न मिळू लागले. दरवर्षी ५० टनांपर्यंत उत्पादन घेतले जात असून, सुमारे ३५ लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळत आहे. सरासरी दर ५० ते ८० रुपये प्रतिकिलो मिळत असून, बांधावरच विक्रीचे नियोजन असते.

चेन्नई, बंगळूर येथे शेवगा पॅकिंग करीत विक्रीसाठी पाठवीत आहे. शेवगा शेती कमी खर्चात होत असून, फवारणी व नैसर्गिक आपत्तीचा धोकाही कमी असल्याने ही शेती परवडत असल्याचे भूपेश यांनी सांगितले. त्यांच्या शेती व्यवसायाचे वेगळेपण इतरांनी अंगीकारले तर युवकांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही, हे निश्चित. (latest marathi news)

Bhupesh Deore's paddy fields flourished in Deur (Dhule district) Shiwar.
सह्याद्रीचा माथा : सुलवाडे जामफळ, पाडळसरेला गती, इतर प्रकल्पही मार्गी लागावेत!

शेतीने दिला सन्मान

भूपेश आज शेवग्याच्या शेतीतून वर्षाकाठी खर्च वजा जाता किमान ३० लाखांचे भरघोस उत्पन्न मिळवीत आहेत. ही किमया नसून, उत्कृष्ट व्यवस्थापनाचा आणि प्रयोगशीलतेचा प्रत्यय आहे. शेवगा शेतीतून प्रगती साधत युवकांसमोर त्यांनी वेगळा आदर्श उभा केला आहे.

शेतीतील त्यांच्या योगदानाबद्दल भूपेशला यंदा (कै.) वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल ‘सन्मानपत्र’ देऊन गौरव करण्यात आला.

भूपेश देवरे यांचे कृषी, सामाजिक योगदान

अलीकडे शेती परवडत नाही, अशी शेतकऱ्यांची रड आहे. यात तरुण शेतकरीही अपवाद नाहीत. अगदी कमी वयात भूपेश यांनी साक्री तालुक्यातील शेकडो तरुण शेतकऱ्यांना आधुनिक, तंत्रशुद्ध शेती करण्यासाठी आग्रह धरत, मोफत मार्गदर्शन सुरू केले आहे. बाजारपेठेविषयी माहिती देत ती कशी निवडावी, याच्याही मोलाच्या टिप्स देत आहेत.

यातून तरुण केवळ नोकरीची अपेक्षा न धरता शेतीतही वेगळेपण सिद्ध करता येईल, असा धडाच युवकांना घालून दिला आहे. पारंपरिक शेतीला अनेक शेतकरी वैतागून गेले आहेत. त्यात तरुणांची शेती विषयीची मानसिकता आज राहिली नसल्याचे चित्र आहे.

यापार्श्वभूमीवर भूपेश स्वतः इतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करतात हे विशेष. गेल्या दहा वर्षांपासून नोकरी न लागलेल्या ७० युवकांना फळ, भाजीपाला शेतीसाठी प्रवृत्त केले आहे. यातून त्यांच्या बळीराजा ग्रुपच्या तरुण शेतकऱ्यांचा युवा शेतकरी कसा पुढे जाईल, याचा प्रामाणिक प्रयत्न ते तरुण शेतकऱ्यांमध्ये शेतीविषयी उमेद जागवत आहेत. 

Bhupesh Deore's paddy fields flourished in Deur (Dhule district) Shiwar.
सह्याद्रीचा माथा : नारपार, निओ मेट्रोसाठी लक्ष घालायलाच हवे !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.