Uttar Pradesh : दानापूर परिसरात पावसाचा कहर सुरूच!

हातातोंडाशी आलेला घास जाणार असल्याने शेतकरी चिंतेत
Rain updates
Rain updatesesakal
Updated on

दानापूर : परिसरात गत दोन दिवसाआधी मध्यरात्री पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन, तसेच वेचणीस आलेला बागायती कापूस भिजला असून, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेते काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Rain updates
Uttar Pradesh: अयोध्येत राममंदिराआधीच योगी आदित्यनाथांचं मंदिर; दररोज होते पूजाअर्चा

गत दहा दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पीक तयार करणे चालू केले; मात्र गुरुवारी (ता.६) मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने दानापूरसह सोगोडा, बोरखेड, हिंगणी, सौंदळा, वारखेड, रायखेड, कोठा, माळेगाव बाजार, बेलखेड आदी भागात कहर केला आणि शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन ओले झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या गंजी ताडपत्री द्वारे शेतातच झाकून ठेवल्याने त्याचे काही प्रमाणात नुकसान वाचले. सततच्या तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटाला शेतकरी कंटाळला असून, कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.

Rain updates
Uttar Pradesh Accident : डबल डेकर बसचा भीषण अपघात; आठ ठार, १६ जखमी

दानापूर परिसरात यंदा ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन पीक फूल धारणाअवस्थेत असताना बुरशीजन्य रोगामुळे फूल गळून पडले, त्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न एकरी दीड ते दोन क्विंटलवर आले. कपाशीचे बोंड काळसर झाल्यामुळे कपाशीच्या उत्पनात हमखास घट शेतकऱ्यांना दिसत आहे.

Rain updates
Uttar Pradesh | उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात, कारमधील पाच जण जागीच ठार

अजून काही दिवस पाऊस राहिल्यास शेतकऱ्यांचे शेतात राहिलेले सोयाबीन, कापूस मातीत जाण्याची भीती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्वरित शासनाने शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, तसेच पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी दानापूरसह परिसरातील शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे.

Rain updates
Uttar pradesh : नोएडात इलेक्ट्रॉनिक पार्क

अचानक आलेल्या वादळ व पावसामुळे तीन एकरातील वेचणीस आलेला कापूस ओला होऊन बोंडे काही मातीत मिसळली. अति पाऊसामुळे कापूस उत्पदनात मोठी घट समोर दिसत आहे.

- विनोद लाव्होडे, शेतकरी, दानापूर

दोन एकरातील सोयाबीनचा सोंगून ठेवलेली गंजी शेतात होती. गुरुवारी (ता.६) मध्यरात्री अचानक जोराचा पाऊस आल्यामळे गंजीत पाणी मुरले. अधिक पावसाचा येण्याचा अंदाज असल्यामुळे ताडपत्री टाकून सोयाबीनची गंजी झाकून ठेवली.

- विलास खवले, शेतकरी, दानापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.