Nandurbar News : वडाळीतील पशुवैद्यकीय दवाखानाच आजारी! पशुसंवर्धनचा अनागोंदी कारभार

Category 1 veterinary clinic in dilapidated condition due to absence of veterinary officer.
Category 1 veterinary clinic in dilapidated condition due to absence of veterinary officer.esakal
Updated on

वडाळी (जि. नंदुरबार) : येथील श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना अनेक वर्षांपासून नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. वडाळीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या गुरांना यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच आजारी झाला आहे.

यामुळे पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पशुधन बाळगणाऱ्या पशुमालकांच्या चिंतेत भर पडली आहे. कायमस्वरूपी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी मिळविण्यासाठी अजून किती वर्षे प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. (Veterinary hospital in Wadali bad condition Chaos management of animal husbandry department Nandurbar News)

वडाळी गाव केंद्रस्थानी आहे. त्यामुळे परिसरातील वडाळीसह कोंढावळ, खापरखेडा, मातकूट, बोरळे, खैरवे-भडगाव, उभादगड, धांद्रे प्लाट या नऊ गावांतील पशुपालक पशुवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी येथे येत असतात. या दवाखान्याला चार पदे मंजूर आहेत.

त्यात एक पशुवैद्यकीय अधिकारी, दोन परिचर, एक वनोपचारक आहेत. मात्र सद्यःस्थितीत या दवाखान्यात कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. एक वनोपचारक व एक परिचर असून, तात्पुरत्या स्वरूपात ते त्यांच्या ज्ञानाने उपचार करतात.

दोन पदे अजूनही रिक्त आहेत. दवाखान्याचा अतिरिक्त पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपविला असून, ते आठवड्यातून एक-दोन दिवस येतात. परिणामी पाच ते दहा किलोमीटरच्या खेड्यावरून उपचारासाठी आणलेल्या गुरांना उपचार मिळणे तर दूरच परंतु स्थानिक शेतकऱ्यांच्या गुरांनाही शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ मिळत नाही.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Category 1 veterinary clinic in dilapidated condition due to absence of veterinary officer.
Nashik Fire Accident : म्हसरूळ शिवारातील म्हसोबा वाडीत शॉर्टसर्किटमुळे घराला लागली भीषण आग

त्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांना आपल्या गुरांवर खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून महागडा इलाज करून घ्यावा लागतो. प्रशासनाने त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे रिक्त पद भरावे, अशी मागणी पशुपालक करीत आहेत.

"वडाळी येथील दवाखान्यात पंचक्रोशीतील पशुधन मालक पशूंना योग्य उपचार मिळावा यासाठी येथे पायपीट करीत पशू आणत असतात. मात्र या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने आम्हाला खासगी डॉक्टर बोलवून महागडे उपचार करावे लागतात. यामुळे शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ मिळत नाही." -रवींद्र पाटील, मातकूट, पशुधन मालक

"शहादा तालुक्यात श्रेणी १ ची बरीच पदे रिक्त असून, श्रेणी २ व ३ पदांची नियुक्ती जिल्हा परिषदेमार्फत होते. श्रेणी १ पशुविकास अधिकाऱ्याची नियुक्ती मंत्रालयातून केली जाते. सद्यःस्थितीत काही ठिकाणी अतिरिक्त पदभार सोपविला असून, यामुळे थोड्याफार अडचणींचा सामना पशूपालकांना करावा लागत आहे."-सुनील गोसावी, पशुधन विस्ताराधिकारी, शहादा

Category 1 veterinary clinic in dilapidated condition due to absence of veterinary officer.
Balasaheb Thackeray Jayanti : मैला वाहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा धुळ्यात पंचामृताने दुग्धाभिषेक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.