Board Exam : तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे; विद्यार्थ्यांना आवाहन

Dhule News
Dhule Newsesakal
Updated on

साक्री (जि.धुळे) : येत्या २१ फेब्रुवारीपासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेला (Exam) सुरवात होत आहे. (Vigilance committee meeting appeals students to face exams without stress Dhule News)

Dhule News
Dhule News : मनपाकडून ‘स्थगिती’ प्रस्ताव मागविला; मुख्यमंत्र्यांचा दिलासा

या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा द्यावी, तसेच कुठल्याही गैरप्रकारांना, कॉपीसारख्या प्रकारात अडकून शिक्षा व दंड होईल अशी वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन दक्षता समितीच्या बैठकीत सर्वच मान्यवरांनी केले.

येत्या २१ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात दक्षता समिती गठित करण्यात आली असून, समितीची सभा नुकतीच न्यू इंग्लिश स्कूलमधील राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली.

समितीत पालक, शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, पत्रकार, माजी सैनिक, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती आदींचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

बैठकीस उपस्थित समिती सदस्य ॲड. गजेंद्र भोसले यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर होणारा उपद्रव टाळण्यासंदर्भात पोलिस प्रशासनाने पावले उचलण्याचे पोलिस प्रशासनास आवाहन केले. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षा देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

समिती सदस्य विजय भोसले यांनी कोरोनाकाळात झालेल्या परीक्षा व आता होत असलेल्या परीक्षा यातील बदल व परीक्षा काळातील व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एस. बी. पाटील यांनी परीक्षा केंद्रावर पालकांकडून होणारा अडथळा यावर मार्ग काढण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

बैठकीत परीक्षा केंद्राच्या केंद्र संचालिका प्रा. पी. एफ. शिवदे यांनी दक्षता समितीची सभा घेण्याचे प्रायोजन व कामकाज याविषयी माहिती देत जनजागृती व उद्‌बोधनातून विद्यार्थ्यांना तणावमुक्त व कॉपीविरहित परीक्षेविषयी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,

तर उपकेंद्र संचालक प्रा. डी. व्ही. काकडे यांनी परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये व परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी दक्षता समितीने कार्य करण्यासंदर्भात आवाहन करत बैठकीचे प्रास्ताविक केले. प्रा. डी. एच. बेडसे यांनी सूत्रसंचालन केले.

Dhule News
Water Crisis : साक्रीकरांना उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये; पाणीपुरवठा सभापतींच्या अधिकाऱ्यांना सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.