Nandurbar News : आश्रमशाळेतील रिक्त पदे लवकरच भरणार : डॉ. विजयकुमार गावित

vijaykumar gavit statement about Vacancies in ashram schools will be filled soon nandurbar news
vijaykumar gavit statement about Vacancies in ashram schools will be filled soon nandurbar newsesakal
Updated on

नंदुरबार : राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरून आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्यासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांवर अधिक भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले. (vijaykumar gavit statement about Vacancies in ashram schools will be filled soon nandurbar news)

तळोदा तालुक्यातील लोभानी येथील शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात रोजंदारीपदावर कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशाचा वाटप कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला खासदार डॉ. हीना गावित, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत आदी उपस्थित होते.

डॉ. गावित म्हणाले, की राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या दहा वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग तीन, वर्ग चार कर्मचाऱ्यांना ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाने निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे राज्यातील ६४५ कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

vijaykumar gavit statement about Vacancies in ashram schools will be filled soon nandurbar news
Dhule News : वर्षभर लागणारी यंत्रसामग्री खरेदी न करण्याचा प्रश्‍न; भाडेतत्त्वाचा प्रकार केवळ पोसण्यासाठी?

आज मंगळवारी (ता. ४) तळोदा प्रकल्पातील २४४ वर्ग चार कर्मचाऱ्यांना पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनस्तरावर वेतननिश्चिती करून लाभ मिळणार असून, कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या तारखेपासून लागू करण्यात येईल.

या वेळी खासदार डॉ. गावित, आमदार पाडवी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे आदिवासी पारंपरिक ढोलवादन व नृत्याने स्वागत करण्यात आले. या वेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग चार प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले.

के. टी. पाटील व सुधाकर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकल्प अधिकारी मंदार पत्की यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी. एफ. वसावे, डी. जी. वाणी, शिक्षण विस्ताराधिकारी बी. आर. मुगळे यांच्यासह लोभानी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

vijaykumar gavit statement about Vacancies in ashram schools will be filled soon nandurbar news
Nandurbar News : फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घ्या; येथे करा ऑनलाइन अर्ज..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.