Viral Infection Case Rise : नंदुरबार फणफणले; सर्दी, खोकला, ताप व अंगदुखीने नागरिक हैराण!

 Cough
Coughesakal
Updated on

नंदुरबार : सध्याच्या वातावरणातील बदलामुळे मानवी आरोग्यावर मोठा परिणाम जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

त्यामुळे हॉस्पिटल हाउसफुल दिसून येत आहेत. (viral infection case rise Due to climate change there has been huge increase in number of viral infection patient nandurbar news)

गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या कोरोनाच्या उद्रेकाने देश हादरला होता. अजूनही कोरोनाची भीती गेलेली नाही. तोपर्यंत एच-३, एफ-२ व्हायरसने आक्रमण केले आहे. महाराष्ट्रात त्याचे प्रमाण नसल्यागत आहे. तरीही काळजी म्हणून शासन-प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांना कोरोनासारखेच मास्क घालून वावरण्याचा सल्ला वैद्यकीय सूत्रांकडून दिला जात आहे.

असे असताना सध्या निसर्गचक्र बदलले आहे. उन्हाळा सुरू असतानाही हिवाळा व पावसाळ्याचा प्रत्यय जनतेला येत आहे. रात्री थंडी, दिवसा उन्हाचा तडाका व त्यासोबतच अवकाळी पाऊस आणि त्यामुळे होणारा गारठा यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम जाणवू लागले आहेत. सध्या शहर व परिसरात जिकडे-तिकडे आजारपण व घराघरात रुग्ण आढळून येत आहेत. जो-तो म्हणतो, की व्हायरल इन्फेक्शन झाले.

डॉक्टर म्हणतात, व्हायरल इन्फेक्शन झाले. व्हायरल इन्फेक्शनमध्ये ताप, डोकेदुखी, सर्दी खोकला हमखास दिसून येत आहे. त्यामुळे घरात एक रुग्ण असेल तर तो बरा होत नाही तोच दुसऱ्या सदस्याला थंडी-ताप, सर्दीची लक्षणे जाणवतात. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात सध्या व्हायरल इन्फेक्शनचीच दहशत वाढली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील हॉस्पिटल, दवाखाने हाउसफुल दिसून येत आहेत. दवाखाने व औषध विक्रेत्यांचा दुकानांवर गर्दी वाढली आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

 Cough
SAKAL Exclusive: उद्योगांसाठी वाडीवऱ्हे भागात 200 एकर जमीन; गोंदे वसाहतीला लागूनच औद्योगिक विकासाचे नियोजन

पॅथॉलॉजी लॅबमध्येही गर्दी

रुग्णांची संख्या लक्षात घेता पॅथॉलॉजी लॅबमध्येही गर्दी वाढली आहे. रक्त, लघवी, थुंकी तपासणीसह इतर विविध प्रकारच्या चाचण्या करून घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला असतो. त्यामुळे त्यांनी लिहून दिलेल्या चाचण्यांसाठी शहरातील पॅथॉलॉजी लॅबवरही गर्दी होऊ लागली आहे.

"सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण सध्या जास्त आहेत. त्यामुळे त्याच्यासोबत डोकेदुखी आणि थंडी वाजणे आलेच. सध्याच्या वातावरणामुळे आरोग्यावर हा परिणाम वाढलेला आहे. व्हायरल म्हणजे एखाद्या रुग्णाच्या इन्फेक्शनमुळे घरातील दुसरा सदस्यही आजारी पडतो असे सध्या चित्र आहे. मात्र त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. रुग्णांनी वेळेवर उपचार घेतला तर तत्काळ आराम मिळतो." -डॉ. सतीश पाटील, नंदुरबार

 Cough
Electricity Payment : सुटीच्या 2 दिवशी वीजभरणा केंद्र राहणारा सुरू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.