निमगूळ (जि. धुळे) : येथील भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सयाजीराव बागल यांचे आजोबा बुधाजीराव बागल यांनी १९२२ ला पालखी उत्सव सुरु केला. शेकडो वर्षापासून चालत आलेला श्री विठ्ठल रुक्मिणी पालखी शताब्दी सोहळा सोमवारी (ता.८) पार पडला.
पालखी उत्सवाला सुरवात झाल्यापासून रोज पहाटे काकड आरती, संध्याकाळी आरती व प्रसाद, रात्री भजन तसेच अखंड दिवस रात्र टाळ वाजणेची सेवा सुरू आहे. श्रावण एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पालखी मिरवणुक काढली जाते, त्यानंतर गोपाळकाल्याला महाप्रसादानंतर उत्सवाची सांगता होते. (Vitthal Rukmini palkhi procession to Nimgul tradition of 100 years ago dhule Latest Marathi News)
१९६९ नंतर संपूर्ण गावाने ही परंपरा अखंड सुरु ठेवली. पालखीची सयाजीराव बागल, भारती बागल, मृणालिनी बागल, ऋषीनेश बागल, रघुवीर बागल, जितेंद्र बागल यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.
महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी, पंचायत समितीचे माजी सभापती रघुवीर बागल, प्रकाश बागल, सूर्यकांत शिंदे, भाईदास बागल, जयवंतराव बागल, वना बागल, सीताराम शिंपी, रतन महाजन, खंडू बागल, दत्तात्रय आहिरे, नत्थु बागल, छोटू चित्ते, गोपाल गोराणे, प्रकाश बागल, जितेंद्र बागल आदींनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.