Dhule Bypoll Election : 8 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; 'या' तारखेस मतदान

dhule bypoll election
dhule bypoll election esakal
Updated on

Dhule Bypoll Election : शिंदखेडा तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींच्या अकरा सदस्यपदासाठी येत्या १८ मेस मतदान घेण्यात येणार आहे.

नामनिर्देशन पत्रासोबत जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. (Voting will be held on May 18 for 11 member posts of 8 gram panchayats in Shindkheda dhule news)

शिंदखेडा तालुक्यातील राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या अकरा जागांचा त्यात समावेश आहे.

निवडणुक कार्यक्रम असा : तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे- १८ एप्रिल, नामनिर्देशन पत्रे मागविण्याचा व सादर करणे- २५ एप्रिल ते २ मे (सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत), नामनिर्देशन पत्र छाननी- ३ मे, अर्ज मागे घेण्याची मुदत ८ मेस दुपारी तीनपर्यंत. तर, १८ मेस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दरम्यान, महाळपूर ग्रामपंचायतीच्या एक अनुसूचित जमाती, कुंभारे (प्र. नंदुरबार) एक सर्वसाधारण, म्हळसर एक सर्वसाधारण, चिलाणे दोन अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती, तामथरे एक सर्वसाधारण, झोटवाडे एक अनुसूचित जमाती महिला राखीव, चौगाव बुद्रुक एक सर्वसाधारण व दोन सर्वधारण महिला अशा तीन जागा, जखाणे मागास प्रवर्ग महिलेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होईल.

dhule bypoll election
Gram Panchayat Bypoll Election : जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक; 61 रिक्त जागांसाठी लढत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.