Gram Panchayat Election: जिल्ह्यात प्रभागरचना कार्यक्रम जाहीर; 3 टप्प्यांत होणार अंमलबजावणी

gram panchayat election
gram panchayat electionesakal
Updated on

Gram Panchayat Election: ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्याकडील २५ सप्टेंबर २०२३ च्या आदेशान्वये जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच २०२४ मध्ये नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना कार्यक्रम जाहीर झाल्याची माहिती उपजिल्हाधिकारी ( महसूल प्रशासन) यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.(Ward formation program announced in district nandurbar news)

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील ५, शहादा तालुक्यातील २४, नंदुरबार तालुक्यातील २३, अक्कलकुवा तालुक्यातील २ व तळोदा तालुक्यातील ४ अशा एकूण ५८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागरचना कार्यक्रम सुरू आहे.

टप्पा एक ःअसा असेल कार्यक्रम

६ ऑक्टोबर ः तहसीलदारांनी गुगल अर्थचे नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे.

१६ ऑक्टोबर ः संबंधित तलाठी व ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करणे.

२६ ऑक्टोबर ः तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रभागरचनेची तपासणी करणे, समितीमध्ये गटविकास अधिकारी संबंधित मंडळ अधिकारी यांचा समावेश असेल.

३ नोव्हेंबर ः समितीने प्रभाग प्रारूप रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर करणे.

gram panchayat election
Nashik Ajit Pawar : शरद पवार गटाकडून अजित पवारांच्या वाहनांसमोर टोमॅटो व कांदाफेक

१० नोव्हेंबर ः जिल्हाधिकाऱ्यांनी नमुना ब (प्रारूप प्रभागरचना)ची संक्षिप्त तपासणी करणे व त्यात आवश्यक असल्यास दुरुस्त्या करून प्रारूप राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करणे.

२० नोव्हेंबर ः राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला सक्षम अधिकारी यांनी आवश्यक असल्यास प्रस्तावात दुरुस्ती करणे व त्यास मान्यता देणे.

२८ नोव्हेंबर ः या दुरुस्त्या अंतर्भूत करून प्रारूप प्रभागरचना तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने मान्यता द्यावी व समितीच्या सदस्यांनी स्वाक्षरी करावी.

टप्पा दोन ः प्रारूप प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविणे.

४ डिसेंबर ः प्रारूप प्रभागरचनेला (नमुना ब) व्यापक प्रसिद्धी देऊन तहसीलदारांनी हरकती व सूचना मागविण्यासाठी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख.

११ डिसेंबर ः प्रारूप प्रभागरचनेवर हरकती सादर करण्याची अंतिम तारीख.

१८ डिसेंबर ः प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे.

gram panchayat election
Nashik Ajit Pawar : अजित पवार आज दिंडोरीसह कळवण अन् नाशिक दौऱ्यावर; सायंकाळी कार्यकर्त्यांशी होणार संवाद

२६ डिसेंबर ः प्राप्त झालेल्या सर्व हरकती व सूचनांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेणे.

२ जानेवारी २०२४ ः आलेल्या प्रत्येक हरकती व सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे.

टप्पा तीन ः प्रभागरचना अंतिम करणे.

९ जानेवारी २०२४ ः उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकारी यांनी प्रभागरचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणे.

१६ जानेवारी ः राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभागरचनेला जिल्हाधिकाऱ्यांनी (नमुना अ मध्ये) व्यापक प्रसिद्धी देणे.

gram panchayat election
Dhule Gram Panchayat Election : ‘त्या’ क्षेत्रात आचारसंहिता लागू; जिल्ह्यात 31 ग्रामपंचायतींत निवडणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.