Temperature Rise : वाढत्या तापमानाची पशुपक्ष्यांनाही झळ; पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवाराकडे...

Temperature Rise : वाढत्या तापमानाची पशुपक्ष्यांनाही झळ; पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवाराकडे...
esakal
Updated on

Dhule News : तापमानाचा पारा‌ कधी नव्हे तो दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाढत्या तापमानाची ‘झळ’ मानवासह पशु-पक्ष्यांनाही बसत आहे. बहुतेक ठिकाणच्या वनक्षेत्रातील पाणवठे आटल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्य पशू शेतशिवाराकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. (water bodies in forest area have dried up wild animals are running towards farms in search of water dhule news)

वाढत्या उष्णतेमुळे भविष्यात पशु-पक्ष्यांचे वास्तव्यही धोक्यात येऊ शकते. शुक्रवारी (ता. १२) दुपारी काळगावलगतच्या वनक्षेत्रात दुचाकीस्वारांना लांडग्यांची जोडी शेतशिवाराकडे जाताना दृष्टीस पडली. राज्यात धुळे जिल्ह्यात सर्वांत जास्त लांडगे असल्याची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी कमी ३८ अंश सेल्सिअस इतका असलेला तापमानाचा पारा आता ४० अंशांच्या वर पोचला आहे. उष्‍णतेच्‍या तीव्र झळा जाणवत असून, जणू ही धोक्‍याची घंटाच आहे. यंदा एप्रिल महिना अवकाळी पावसात गेल्यामुळे एप्रिल हॉट ठरला नाही.

मे महिन्यात तापमानवाढीचा अनुभव येऊ लागला. बुधवारी (ता. १०) देशभरात सर्वाधिक कमाल तापमान नोंदले गेले. अगदी सकाळी नऊपासून सायंकाळी पाचपर्यंत प्रचंड तापमान असते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Temperature Rise : वाढत्या तापमानाची पशुपक्ष्यांनाही झळ; पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवाराकडे...
Dhule Municipality Fraud : धुळेकरांची फसवणूक; घोटाळेबाज आस्था संस्थेला टेकाळे, कापडणीसांचे अभय का?

पश्चिम पट्ट्यातही उष्णतेचा दाह

साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील वनक्षेत्र बऱ्यापैकी सुरक्षित आहे. नैसर्गिक सौंदर्य, वनराई असल्याने उन्हाळ्यात पश्चिम पट्ट्यात उष्णतेचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले जाते; परंतु यंदा या भागातही उष्णतेची लाहीलाही होत आहे.

म्हसदी ते शेंदवड मांजरीपर्यंत शेकडो हेक्टर वनक्षेत्र आहे. डोंगरांच्या रांगा असून, तापमानाचा उच्चांक गाठत आहे. तापमान ४० अंशांपर्यंत पोचले असून, ही जिल्ह्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. आता पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.

प्राणी, पक्ष्यांचे स्थलांतर

साक्री तालुक्यात हजारो हेक्टर सुरक्षित वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात ससा, हरणे, कोल्हे, लांडगे, तरस, वानरे, बिबटे यांसारखे वन्यपशू तर मोर, तितर, कबुतरासारखे पक्षी वास्तव्यास आहेत. मुबलक पावसामुळे वनक्षेत्रातील पाणवठ्यात पाणीसाठाही होता. तीव्र उन्हामुळे पाणवठे आटत चालले आहेत.

पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू महसूल क्षेत्रात येतात किंवा स्थलांतर करतात. स्थलांतर करून ते प्राणी जाणार कुठे, हाही प्रश्न आहेच. दर वर्षी वन्यपशूंची संख्या वाढत असल्याचे वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी सांगतात. जंगल संपत्तीच्या संवर्धनाबरोबरच पशु- पक्ष्यांचेही संवर्धन होणे आवश्यक असल्याचे निसर्ग, पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

Temperature Rise : वाढत्या तापमानाची पशुपक्ष्यांनाही झळ; पाण्याच्या शोधार्थ वन्यपशू शेतशिवाराकडे...
SAKAL Impact : ऑनलाइन तक्रारी कमी करण्याच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.