Nandurbar Water Cut : जलशुद्धीकरण केंद्रापासून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरातील हाट दरवाजा व नागाईनगर जलकुंभावरून करण्यात येणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे. (Water supply from Hat Darwaza and Nagainagar water bodies in city will be closed for 2 days nandurbar news)
नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागूल यांनी केले आहे.
नंदुरबार शहराला टोकरतलाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी पुरवठा केला जातो. ती मुख्य जलवाहिनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात तुटली आहे. त्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे.
त्यामुळे जलवाहिनी दुरुस्त होऊन पाणी पुरवठा सुरू होण्यास किमान दोन दिवस लागतील. त्यामुळे शहरातील हाट दरवाजा व नागाईनगर या दोन जलकुंभावरून होणारा पाणीपुरवठा ९ व १० जून असे दोन दिवस बंद राहील. ११ जूनला त्या परिसरात उशिरा पाणीपुरवठा सुरू होईल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
येथे बंद राहील पाणीपुरवठा
हाटदरवाजा जलकुंभ : गांधी पुतळा, नेहरू पुतळा, माणिक चौक, गोपाल भय्या घरामागील परिसर, अंकुर हॉस्पिटल, तांबुलवेल पतसंस्था, आरती पावभाजी, हाटदरवाजा टेकडी व शाळा क्रमांक एक परिसर, द्वारकाधीश मंदिर, मोची गल्ली व मलकवाडा.
नागाईनगर जलकुंभ : जुनी सिंधी कॉलनी, तळोदा रोड, गुरूनानक सोसायटी, शिक्षक कॉलनी, श्रीराम सोसायटी, धर्मराजनगर, नागाईनगर, ईश्वर कॉलनी, मंगलमूर्तीनगर, ठाकरसिंग बाबानगर, त्रिवेणीनगर, ग्रीन पार्क, नर्मदा कॉलनी, जयहिंद कॉलनी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.