Water Supply News : ‘तापी’ चा पाणीपुरवठा सुरू; जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ उपसला

Acacia: Laborer removing sludge from water treatment plant.
Acacia: Laborer removing sludge from water treatment plant.esakal
Updated on

Dhule News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेवर महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. हे काम संपवून शनिवारी (ता. २०) सायंकाळीच पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

त्यामुळे शहरात रविवारी (ता. २१) पाणी पोचले खरे पण शहराच्या विविध भागांतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे धुळेकरांना पाण्यासाठीची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.(Water supply to Tapi started Sludge from water treatment plant removed Repair of leaks too Dhule News)

धुळे शहराच्या ६० टक्के भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेवरील बाभळे जलशुद्धीकरण केंद्रातील क्लॅरीफॅक्युलेटरमधील गाळ काढणे, ब्रिजच्या दुरुस्तीसह मुख्य जलवाहिनीवरील ठिकठिकाणच्या गळत्या दुरुस्त करण्याचे काम शनिवारी सकाळी हाती घेण्यात आले.

यासाठी धुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. बाभळे जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे जिकिरीचे कामही कामगारांच्या मदतीने करण्यात आले. क्लॅरीफक्युलेटमधून सुमारे २०० क्युबिक मीटर गाळ काढल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Acacia: Laborer removing sludge from water treatment plant.
Dhule News : विनापरवानगी साठवलेले HTBT कापसाचे बियाणे जप्त

तसेच सुकवद पंपिंग स्टेशन ते बाभळे जलशुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे धुळे शहरादरम्यान ठिकाठिकाणी पाच-सात ठिकाणी लागलेल्या जलवाहिन्यांच्या गळत्यांची दुरुस्तीही युद्धपातळीवर करण्यात आली.

दुरुस्तीचे काम संपल्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, जलवाहिनी रिचार्ज होण्यासाठी मोठा अवधी लागतो. त्यामुळे रविवारी शहरात पाणी पोचले. काही जलकुंभ भरण्यासही सुरवात झाली.

धुळे शहरात पाणी पोचले असले तरी त्या-त्या जलकुंभातून घराघरांपर्यंत पोचण्यास विलंब लागणार आहे. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच पुढे ढकलल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यास किमान आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. नागरिकांना नियोजित वेळापत्रकाच्या किमान एक-दोन दिवस उशिरा पाणी मिळण्याची शक्यता आहे.

Acacia: Laborer removing sludge from water treatment plant.
Dhule News : उन्हाळी सुटीतही गुरुजी रमले शाळेत; झाडे जगविण्यासाठी शरद चौधरींची धडपड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.