धुळे : महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी शहरातील कचरा संकलनाचे काम करणाऱ्या वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स (नाशिक) या कंपनीने महापालिका मालकीची वाहने शहरात बेवारस सोडली होती. ही वाहने अखेर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. संबंधित वाहनांवर होणारा दुरुस्तीचा खर्च वॉटरग्रेस कंपनीकडून वसूल करण्यात येणार आहे. (Watergrace seizes abandoned vehicles Proceedings from dhule Municipal Corporation Dhule News)
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
धुळे शहरात महापालिकेच्या माध्यमातून यापूर्वी घनकचरा संकलन व वाहतुकीचे काम वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या कंपनीकडे होते. कंपनीस तीन वर्षांसाठी हे काम दिले होते. मात्र कंपनीच्या बेजबाबदार कामाबाबत सातत्याने नगरसेवकांनी स्थायी समिती सभेत तक्रारी केल्या. त्यानंतर एकूण शहराची परिस्थिती लक्षात घेता वॉटरग्रेसचे कचरा संकलन व वाहतुकीचे काम बंद करून नव्याने कंत्राट देण्यात आले.
दरम्यान, वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स या कंपनीला कचरा संकलन करण्यासाठी दहा मेटॅडोर ४०७ व एक झुलागाडी अशी वाहने महापालिकेने दिली होती. या वाहनांची वॉटरग्रेसने कुठल्याही प्रकारे देखभाल-दुरुस्ती केली नाही. ही वाहने शहराच्या विविध ठिकाणी नादुरुस्त अवस्थेत बेवारस पडलेली होती. या प्रकाराची उपायुक्त विजय सनेर यांनी दखल घेऊन वाहने पडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. संबंधित वाहने दुरुस्तीसाठी उज्ज्वल ऑटोमोटिव्ह येथे पाठविल्या. दरम्यान, या वाहनांच्या दुरुस्तीवर होणारा सर्व खर्च वॉटरग्रेस कंपनीकडून वसूल करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाली. वाहने ताब्यात घेताना उपायुक्त श्री. सनेर, आरोग्य विभागाचे कार्यालयप्रमुख राजेंद्र माईनकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील, वाहन विभागप्रमुख सुक्राम राऊत, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे, गजानन चौधरी, महेंद्र ठाकरे, मनीष आघाव, शुभम केदार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.