Weather Forecast : जिल्ह्यात पुन्हा वादळी अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला अलर्ट!

Cloudy weather in nashik
Cloudy weather in nashikesakal
Updated on

नंदुरबार : जिल्ह्यात ७ मार्चला झालेल्या वादळी पावसानंतर पुन्हा १३ ते १७ मार्चदरम्यान काही ठिकाणी वादळी, तर काही ठिकाणी तुरळक व हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

वादळी वारा व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Forecast Chance of unseasonal rain again in district weather department gave an alert nandurbar news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Cloudy weather in nashik
Jalgaon News : वाढीव भाडे, घरपट्टीला शासनाची स्थगिती; अस्थिर झालेल्या पारोळेकरांना दिलासा

भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त अंदाजानुसार, हवामानात पुन्हा बदल होत आहे. राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यात १३ ते १७ मार्चदरम्यान हवामानात बदल राहील. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस होईल.

वादळी वारे व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, नागरिकांनी व शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, कापणी केलेली रब्बी पिके आच्छादित करून घ्यावीत, केळी व पपई यांची तोडणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. हेडगेवार समितीच्या कोळदा कृषी विज्ञान केंद्राने केले आहे.

Cloudy weather in nashik
PM Svanidhi Yojana : अडीच हजार लाभार्थ्यांना कर्जवाटप; तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी अर्ज करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.