Dhule News : ‘बिबट्यां’मुळे लांडग्यांचा अधिवास धोक्यात; लांडग्यांचा काढता पाय..

Wildlife expert Siddhesh Brahmankar found a herd of wolves near the dam.
Wildlife expert Siddhesh Brahmankar found a herd of wolves near the dam. esakal
Updated on

Dhule News : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याप्रमाणेच श्वान कुळातील वन्यपशू लांडग्यांसाठी धुळे जिल्हा देखील प्रसिद्ध आहे. सध्यास्थित लांडग्यांच्या अधिवासावर अनेक संकटे उभी ठाकली आहेत.

बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे लांडग्यांनी काढता पाय घेतल्याचे वन्यपशू अभ्यासक सांगतात. शिवाय भटकी कुत्री देखील लांडग्यांसाठी उपद्रवी ठरत असल्याची माहिती पुढे आली आहे. (Wolves are leaving sakri jungle due to increasing number of leopards dhule news)

पश्चिम घाटाची सुरवात कोठून असा प्रश्न विचारल्यास आपसूकच नाशिकपासून हे उत्तर येते. पण पश्चिम घाटाची खरी सुरवात साक्री (धुळे) तालुक्यातून होते. गवताळ, झुडपाळ प्रदेश म्हणून तालुक्याची ओळख आहे. साक्री, शिरपूर तालुक्यातील काही भागात वनक्षेत्र आहे. उर्वरित संपूर्ण जिल्हा हा खुरटी झुडुपे, गवताळ प्रदेशाची वने म्हणून ओळखला जातो.

दाट वने नाहीत म्हणून येथे वन्यजीव नाहीत का तर तसे नाही, जंगलाचे घनदाट, गवताळ, झुडपाळ असे प्रकार असतात. ज्या प्रकारचा अधिवास असेल तसे वन्यजीव आढळतात. जिल्ह्यातील जंगलात बिबटे, तरस, लांडगा, कोल्हा, खोकड, साळिंदर, रान ससा, नीलगाय, काळवीट, चिंकारा, हरिण, रान मांजर, उदमांजर, तसेच जगातील सर्वात छोटी मांजर म्हणून ओळख असलेली रस्टी स्पोटेड कॅट व इतर वन्यजीव आढळून येत असल्याची माहिती वन्यपशू अभ्यासक उमाकांत पाटील यांनी दिली.

लांडगा जिव्हाळ्याचा विषय

लांडगा वन्यजीवप्रेमी, वन्यजीव अभ्यासकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. लांडगा हा पट्टेरी वाघाप्रमाने संकटग्रस्त प्राणी म्हणून घोषित आहे. लांडगा माळरान प्रदेशातील जैवअन्न साखळीतील प्रमुख सदस्य आहे. लांडगा समूहात राहत समूहाने शिकार करणारा प्राणी आहे. अतिशय चपळ, बुद्धिमान व धूर्त प्राणी म्हणून परिचित आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Wildlife expert Siddhesh Brahmankar found a herd of wolves near the dam.
Sanjay Raut : 'महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा कचरा !' नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर संजय राऊत भडकले

ते हिवाळ्यात प्रजनन करता. जमीन कोरत गुहेत पिल्लांना जन्म देतात. १५ दिवस पिल्ले गुहेतच राहतात. दोन महिन्याचे झाल्यावर मांस खायला सुरवात करतात. रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात. मॉन्सून ऋतूत पिल्लांना शिकारीचा सराव देण्याकरिता लांडगे दिवसाही सक्रिय होतात. लांडगा हरिण, काळवीट, ससे, तृणभक्षी प्राण्यांची तसेच, तितर व इतर पक्ष्यांच्या शिकारीवर उपजीविका भागवतात.

वनक्षेत्राचा ऱ्हास, अतिक्रमणामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. वनक्षेत्रात नैसर्गिक शिकार न मिळाल्यास लांडगा पशुधनाची शिकार करतो. पशुधनाच्या नुकसानीमुळे मानव व वन्यजीव संघर्ष वाढतो. मानवाकडून फासे लावून, मृत प्राण्यांच्या मृतदेहावर विष टाकून लांडग्याला ठार मारण्याच्या बेकायदेशीर घटना घडतात.

लांडग्यांसमोरील आव्हाने

पूर्वी साक्री तालुक्यात लांडग्यांचा अधिवास होता. काटवान व पठारी भागापैकी सोळा गाव काटवान सध्या बिबट्याचे माहेरघर झाले आहे. बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे लांडग्यांनी या भागातून काढता पाय घेतला आहे. दुसरीकडे पठारी भागावर येऊ घातलेल्या सौर व पवन ऊर्जा प्रकल्पामुळे लांडग्यांचा अधिवास असलेल्या हजारो हेक्टर जमिनीवर प्रकल्प झाले आहेत.

Wildlife expert Siddhesh Brahmankar found a herd of wolves near the dam.
Water Scarcity : जिल्ह्यातील धरणांत 36 टक्केच पाणीसाठा; आवर्तने मिळणार उशिराने

शिवाय लांडग्यांवर भटक्या कुत्र्यांनी संक्रांत आणली आहे. भटकी कुत्रे माळरानातील वन्य जीवांकरिता खूप मोठी समस्या ठरत आहेत. भटके कुत्रेही लांडग्यांप्रमाणे समूह करून माळरानावर राहू लागले आहेत.

२०१३ मध्ये धुळे शहरालगतच्या लळिंग कुरणात एका समूहात १६ भटक्या कुत्र्यांची नोंद करण्यात आली होती. कुत्र्यांच्या समूहाने चिंकारा हरणाची शिकार व लांडग्याच्या पिल्लास ठार केल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

"माळरान वनक्षेत्र शासनाने काढलेल्या शतकोटी वृक्ष लागवडीच्या फतव्यामुळे संकटात सापडले आहे. वृक्षारोपण काळाची गरजअसली तरी वनविभागाने माळरान जमीन पडीक न समजता तो जंगलांचा एक भाग समजून घेणे अत्यावश्यक आहे. वन्यपशूंचा अधिवास असणाऱ्या भागात तरी वृक्षारोपण करणे प्रकर्षाने टाळायला हवे." -श्री. उमाकांत पाटील, वन्यजीव अभ्यासक, धुळे

Wildlife expert Siddhesh Brahmankar found a herd of wolves near the dam.
Dhule News : बेकायदेशीर नळधारकांना पाचपट पाणीपट्टीचा भुर्दंड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()