Nandurbar Accident News : शहराजवळच असलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील बालाजी पेट्रोलपंप समोर शुक्रवारी (ता.८) गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीस दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. अवंतिका कलाल (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे.
दरम्यान या रस्त्यावर यापूर्वी देखील अनेक अपघातांचा घटना घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.(Woman dies in bus collision nandurbar accident news)
तळोद्यातील शनी गल्लीत राहणारे अभिजित किसनसा कलाल (वय ४५) व त्यांची पत्नी अवंतिका कलाल (वय ३८) हे कामानिमित्ताने दुचाकीने चिनोदा चौफुली मार्गे नंदुरबारकडे जाण्यासाठी निघाले. शहरापासून जवळच असलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर असलेल्या बालाजी पेट्रोल पंपासमोर त्यांची दुचाकी आली असता गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (क्रमांक जीजे १८ झेड ८५०९) त्यांचा दुचाकीला जोरदार धडक दिली.
त्यात बसचा मागील भाग दुचाकीला लागल्यामुळे तोल जाऊन दोघे पती-पत्नी दुचाकीवरून खाली रस्त्यावर कोसळले. या अपघातात अवंतिका कलाल यांचा डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना तत्काळ त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान नंदुरबार येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान घटना घडल्यानंतर बस चालक अशोक राजाराम महाले यांनी तळोदा बस स्थानकात वाहन लावून पोलिस ठाणे गाठून पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
महामार्गावर अनेकदा अपघात
शहरापासून जवळच असलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील या रस्त्यावर यापूर्वी देखील असंख्य अपघात घडले असून अपघातात अनेकांना आपला जीव गमवावे लागल्याचा घटना घडल्या आहेत.
दरम्यान अलीकडच्या काळात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. मात्र या रस्त्यावर साधे सूचनाफलक देखील नाहीत तसेच रस्त्यावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.