Womens Day Special : बचतगट ते साधन केंद्राच्या अध्यक्षापर्यंत चा प्रवास | ॲड. दीपमाला पाटील

womens day special adv deepmala patil nandurbar news
womens day special adv deepmala patil nandurbar newsesakal
Updated on

भालेर (जि.नंदुरबार) : अनेक महिलांचे लग्नानंतर परिवार सांभाळण्यातच आयुष्य खर्ची होत असते. मात्र या गोष्टीला विखरण (ता. नंदुरबार) येथील ॲड. दीपमाला पाटील अपवाद ठरल्या आहेत. (womens day special adv deepmala patil nandurbar news)

लग्नानंतर बचतगटाच्या सदस्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पोलिसपाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष ते प्रेरणा संचलित साधन केंद्राच्या अध्यक्षापर्यंत येऊन पोचला. महिलांना महिला समानतेच्या गोष्टी सांगताना आधी त्यांनी आपल्या जीवनात त्याची अंमलबजावणी केलेली दिसून येत आहे.

विखरण येथील डॉ. प्रकाश पाटील यांच्याशी खर्दे पाथर्डे (ता. शिरपूर) येथील ॲड. दीपमाला पाटील यांचे लग्न झाले. विखरण येथे एकत्र कुटुंबात वास्तव्य करीत असताना जीवनात काहीतरी वेगळे करण्याचे ध्येय त्यांच्या मनाशी होते. अशातच त्यांनी २००० मध्ये इच्छापुरी नावाचा बचतगट सुरू केला. त्यासाठी त्यांनी गावातील २० महिलांना एकत्र केले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रेरणेने महिला बचतगटाचे काम सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे सावकाराकडून व्याजाने पैसे घेणे कमी झाले. त्यातच ॲड. दीपमाला पाटील यांनी गावात महिलांचे १६ बचतगट स्थापन केले. लग्नाच्या आधी गावात फक्त एकच बचतगट होता. त्यांनी त्यांच्या इच्छापूर्ती गटाच्या माध्यमातून पापड, कुरडया असे विविध घरगुती पदार्थ तयार करून विक्री केले. बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी जिल्हास्तरीय कायदा सखीचे प्रशिक्षण घेतले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

womens day special adv deepmala patil nandurbar news
Nashik News : ग्रामीण भागातही आता बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक

कुटुंब सांभाळत असताना त्यांनी शिक्षण सुरूच ठेवले. इतिहास विषयात त्यांनी एमए केले. बचतगटाच्या अनुभवामुळे पोलिसपाटीलपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीतही त्या उत्तीर्ण झाल्या. २००९ मध्ये विखरण गावाच्या महिला पोलिस पाटील म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

त्यांचे ज्ञान व त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांना २०२० पासून नंदुरबार तालुका पोलिसपाटील संघटनेचे अध्यक्षपद मिळाले. महिला बचतगटांना मार्गदर्शन करताना महिला सक्षमीकरण व समानता यावर नुसती चर्चा न करता त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अंमलबजावणी केली.

शिक्षणासोबतच आपल्या मुलींनाही उच्चशिक्षित केले. दोन्ही मुलींचे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झाले. संसार, शिक्षण व विविध पदे सांभाळत असताना त्यांनी १५ वर्षांच्या अंतरानंतर २०१६ मध्ये विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्या वकीलही बनल्या. महिला आर्थिक विकास महामंडळाने त्यांची प्रेरणा संचलित साधन केंद्र नंदुरबार तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

महिला सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन

सध्या नंदुरबार शहर व तालुका मिळून ४०० वर बचतगट आहेत. यात सुमारे चार हजार ५०० महिलांना ॲड. दीपमाला पाटील विविध सीएमआरसीच्या महिला बचतगटांना गटाचे महत्त्व पटवून दिले.

womens day special adv deepmala patil nandurbar news
Nashik News: HALला मिळाले 70 ट्रेनर विमानांचे काम

महिलांच्या वेळोवेळी बैठकी घेत महिला हिंसाचाराविरुद्ध करावयाचा उपाययोजनांची माहिती, महिला बचतगटाचे महत्त्व, महिला एकत्रीकरण व सक्षमीकरणासाठी महिलांना मार्गदर्शन, शालेय युवतींना महिला सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पुस्तकाचे वितरण, अधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करून माहिती देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यात महिलांचे हातमाग युनिटही स्थापन करण्यात आले.

कार्याची दखल अन् सन्मान

त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना धुळे महसूल विभागामार्फत कोरोनाकाळात उत्कृष्ट मदतकार्य केल्याबद्दल महिला कोरोनायोद्धा म्हणून सन्मानपत्र, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा (ता. नंदुरबार) यांच्याकडून प्रयोगशील महिला शेतकरी म्हणून सन्मानपत्र, नंदुरबार जिल्हा पोलिस दलामार्फत महिला पोलिसपाटील म्हणून सन्मानित, महाराष्ट्र नवनिर्माण संस्थेकडून पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

womens day special adv deepmala patil nandurbar news
Nashik News : जिल्ह्यात सव्वादोन हजार बालकांना श्‍वसनसंबंधी आजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.