Dhule News : अर्धवट पीचिंगमुळे पुलाला पुन्हा धोका; वाहनांची विनापरवाना वाहतूक कायम

Work in progress of pitching of the bridge. In the second photo, the repaired road with a collapsed bridge. Large vehicles driving without permission in the last photo.
Work in progress of pitching of the bridge. In the second photo, the repaired road with a collapsed bridge. Large vehicles driving without permission in the last photo.esakal
Updated on

Dhule News : सारंगखेडा पुलाचे काम अपूर्णावस्थेत आहे. खालच्या भरावाला अजून वेळ लागणार असून, पुलाला भगदाड पडल्याने फक्त ते काम प्रशासनाने तत्काळ केले असून, उर्वरित भरावाचे काम सुरू आहे.

रविवार (ता. २९)पासून लहान वाहनांना परवानगी देण्यात आली असून, तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.(work of Sarangkheda bridge is incomplete dhule news )

मोठ्या व अवजड वाहनांना बंदी कायम आहे. मात्र २४ ऑक्टोबरपासूनच दसऱ्याच्या मुहूर्तावर लहान-मोठ्या वाहनधारकांनी विनापरवानगी येथील तापी नदीवरील पुलावरून वाहतूक सुरू केली.

अधिकाऱ्यांची पाहणीकडे पाठ

तापी नदीच्या पुलाचा टाकरखेड्याकडील भराव व दगडाच्या पीचिंगचा भाग १७ सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात वाहून गेला, तसेच पुलाच्या तीन ते चार कप्प्यांत भगदाड पडलेले होते. त्यातून पुलाला धोका निर्माण झाला आणि पुलावरील दोन राज्यांत जाणारी-येणारी वाहतूक तत्काळ थांबवून दोंडाईचा-नंदुरबार अशी वळविण्यात आली होती.

मात्र लहान वाहनांना लगतच्या बॅरेजच्या पुलावरून वाहतुकीसाठी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले अन् त्याद्वारे लहान चारचाकी वाहनांची वाहतूक तेथून सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात तशी कोणतीही परवानगी नसल्याने व बॅरेज प्रशासनाने बॅरेज पुलावरून छोट्या गाड्यांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली. २४ ऑक्टोबरला पर्यायी जवळचा मार्ग नसल्याने वाहतुकीचा प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक पाहणी केल्यानंतर पुलावरील वाहतूक सुरू करावी की नाही हा निर्णय घेण्यात येणार होता. तसेच भराव केलेल्या वरील बाजूस डांबरीकरण करावे की काँक्रिटीकरण याबाबतचादेखील निर्णय घेण्यात येणार होता. त्याला दहा दिवस झाले. कोणीही पाहणीसाठी आले नाही. भगदाडाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या खालील दगडाच्या पीचिंगचे काम अर्धवट आहे. अर्धवट पीचिंगमुळे पुलाच्या खालील भागाला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.

Work in progress of pitching of the bridge. In the second photo, the repaired road with a collapsed bridge. Large vehicles driving without permission in the last photo.
Dhule News : अधिकाऱ्यांचा घराकडे पळ, मुख्यालये ओसाड! मुख्यालय न सोडण्याचा मनपा आयुक्तांचा आदेश

जिल्हाधिकऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

या पुलावरून कोणत्या क्षमतेच्या वाहनांची वाहतूक कधीपासून सुरू करावी याचा विचारही संबंधित विभागाला करावा लागणार आहे. पुलावरून लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक तर सुरू झाली. मात्र परराज्यातील अवजड वाहतूक बंद आहे. सध्या पुलाच्या खालच्या पीचिंगचे काम अपूर्ण आहे.

त्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला झाला तरी अवजड वाहतूक धोकादायक ठरणार असल्याने वाहतूक बंद करेल कोण, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे. याविषयी धुळे अभियंत्यांशी दूरध्वनीवरून विचारले असता त्यांनी सांगितल्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्राद्वारे कळविले असून, जिल्हाधिकऱ्यांमार्फत काय निर्णय येतो याकडे लक्ष आहे. वाहतूक मात्र सुरू असून, बसव्यतिरिक्त सर्व वाहने ये-जा करत असल्याचे चित्र आहे.

''आम्ही पुलाच्या रहदारीसाठी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची पाहणी व परिणाम यासाठी माणसाची देखरेखीसाठी नियुक्ती केली आहे. त्यानुसार रस्त्याच्या चाचापणीचे काम सुरू आहे. त्यानंतर मोठी वाहने सुरू करता येतील.''-अनंत शेलार, अभियंता, धुळे

Work in progress of pitching of the bridge. In the second photo, the repaired road with a collapsed bridge. Large vehicles driving without permission in the last photo.
Dhule Leopard News : नरभक्षक बिबट्या ‘रेस्क्यू’च्या शिकंज्यात; दहशत मोडीत पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.