Dhule News : ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेंतंर्गत राज्य शासनामार्फत कामगार विभागातर्फे विविध योजनेचा लाभ देण्यात येत असून कामगार विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते शनिवारी (ता. १०) नंदुरबार तालुक्यातील कोळदा, समशेरपूर, कोरीट, शिंदे गावात झाले. (Workers should register online Dr. Vijaykumar Gavit Appeal to take advantage of various government schemes Dhule News)
कोळदा सरपंच मोहिनी वळवी, उपसरपंच आनंद गावित, समशेरपूरच्या मंदा चौधरी, उपसरपंच रेवता भिल, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, डी. एन. राजपूत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गावित म्हणाले, बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, बांधकाम कामगाराच्या विवाह खर्चासाठी अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल, नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पत्नीस व पतीस अर्थसहाय्य, मध्यान्ह भोजन योजना, कामगारांच्या मुलींचा विवाहाकरिता अर्थसहाय्य, कामगारांना अत्यावश्यक संच वाटप, तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या कामगारांच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर बांधकाम कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना मिळावा यासाठी कामगार मंत्री सुरेश खांडे यांच्याकडे मागणी केली.
नंदुरबार, धुळे जिल्ह्यात विकासकामे
डॉ. गावित म्हणाले की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यात खासदार डॉ. हीना गावित यांनी केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत गॅस संचाचे वाटप केले. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रत्येकाला घर तसेच प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत.
येत्या काळात आदिवासी विकास विभागामार्फत खावटी कर्ज, भजनी मंडळासाठी साहित्य तसेच इतर विविध योजनेचा लाभ देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या नागरिकांचे ‘ड’ यादीत नाव नसलेल्या तसेच ज्या लोकांना घर नाही अशा पात्र व्यक्तींना विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल देणार आहे. एका रेशनकार्डवर एकच घरकुल मिळत असल्याने घरकुलचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्डचे विभक्तीकरण करावे, यानंतरच घरकुल योजनेचा लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.