Dhule News : प्रशासकांच्या काळात कामे मंजुरीला ‘अच्छे दिन’! स्थायी सभेत तब्बल ७२ कोटींची कामे मंजूर

महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपल्यानंतर प्रशासकांच्या काळात शहरातील विकासकामांचे काय होणार अशी चिंता सतावत होती.
Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in the Municipal Standing Committee meeting. front officer
Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in the Municipal Standing Committee meeting. front officeresakal
Updated on

Dhule News : महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांचा पंचवार्षिक कालावधी संपल्यानंतर प्रशासकांच्या काळात शहरातील विकासकामांचे काय होणार अशी चिंता सतावत होती.

मात्र, प्रशासकांच्या कार्यकाळात विविध योजनांमधील कामे मंजुरीचा सपाटा लागल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता. ८) झालेल्या स्थायी समिती सभेत तर तब्बल ७२ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. (Works in various schemes were sanctioned during tenure of administrators dhule news)

यातील बहुतांश कामे रस्त्यांची असून, ओपनस्पेस सुशोभीकरण, उद्यान विकास, जलवाहिनी आदी कामांचा यात समावेश आहे. महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता. ८) महापालिका सभागृहात झाली. महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील, नगरसचिव मनोज वाघ, अधिकारी उपस्थित होते.

सभेत महापालिकेच्या आयुर्वेद दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी योगेश पाटील यांचे मानधन ३० हजारांवरून ४५ हजार रुपये करण्याचा विषय होता. यावर आयुक्त श्रीमती दगडे-पाटील यांनी तूर्त दहा हजार वाढ करण्याचे सुचवत विषय मंजूर करण्यात आला.

तसेच पाण्याचा अपव्यय टाळणे व सुयोग्य नियोजनासाठी पाणीमीटर तसेच प्रेशर मीटर बसविणे, पाणी वितरणासाठी ऑटोमेशन सिस्टिम बसविण्यासाठी सल्लागार नेमणुकीसाठी प्राप्त निविदेचा विषय होता. यात सर्वांत कमी टेक्टॉनिक रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट यांची सात लाख सहा हजार २३० रुपये किमतीच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.

बहात्तर कोटींची कामे मंजूर

मूलभूत सेवा-सुविधा योजनेंतर्गत २०२३-२४ अंतर्गत धुळे मनपा हद्दीत १ ते ३ ठिकाणी रस्ता, गटार करणे तसेच १ ते ७ ठिकाणी रस्ताकाम करणे, १ ते १३ ठिकाणी काँक्रिट रस्ता, ओपनस्पेस सुशोभीकरण, उद्यान विकास, रस्ता डांबरीकरण, पाइपलाइन टाकणे.

Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in the Municipal Standing Committee meeting. front officer
Dhule News : पाण्यावाचून हाल; विहिरीचे पाणी पूर्ववत करा; मोराणेतील नागरिकांची आयुक्तांकडे मागणी

तसेच प्रभाग १५ मधील साई एकता कॉलनीत काँक्रिट रस्ता करणे, प्रभाग १२ मधील गफूरनगर येथे काँक्रिट रस्ता करणे, अल्पसंख्याक क्षेत्र विकास कार्यक्रम २०२३-२४ अंतर्गत प्रभाग क्रमांक ९ मध्ये १ ते ७ कामे करणे.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत धुळे मनपा हद्दीत १ ते ६४ कामे करणे. या सर्व कामांसाठी प्राप्त निविदांवर विचार करून निर्णय घेण्याचे विषय होते. यात सर्वांत कमी दराच्या प्राप्त निविदा मंजूर करण्यात आल्या.

नगरोत्थान योजनेतील ६४ कामांसाठी ५३ कोटी २७ लाख रुपयांची निविदा होती. यासह इतर १८ कोटी ८८ लाखांची कामांचा यात समावेश आहे. त्यामुळे एकूण ७२ कोटी १५ लाख ६० हजार ४७९ रुपये किमतीच्या कामांना मंजुरी देण्यात आली.

कामे...निविदा...निविदाधारक

-१ ते ३ कामे (रस्ते)..............................................................१,९९,९९,०९९ (मे. हिंद कन्स्ट्रक्शन)

-१ ते ७ कामे (रस्ते)..............................................................४,९९,९७,६९५ (मे. हिंद कन्स्ट्रक्शन)

-१ ते १३ कामे (रस्ते, ओपनस्पेस सुशोभीकरण, उद्यानविकास, पाइपलाइन)...९,९९,९७,५८१ (मे. हिंद कन्स्ट्रक्शन)

-रस्ता काँक्रिटीकरण....................................................................३९,९२,०८३ (साजीद अली शाह)

-रस्ता काँक्रिटीकरण.........................................................४९,८५,०८९ (रिजवान अहमद युसूफ पटेल)

-१ ते ७ कामे....................................................................... ९८,६५,३०२ (हेमंत राजाराम बागुल)

-१ ते ६४ कामे.......................................................................५३,२७,२३,६३० (स्वामी जे. व्ही.)

Commissioner and Administrator Amita Dagde-Patil speaking in the Municipal Standing Committee meeting. front officer
Dhule News : शहर वाहतूक नियंत्रण पोलिसांनी फिरविला ‘तीन लाखां’वर रोलर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.