Dhule Municipality News : सव्वापाच कोटींची कामे, खर्चास मंजुरी

महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २३) सकाळी अकराला महापालिकेच्या (स्व.) अटलबिहारी वाजपेयी सभागृहात स्थायीची सभा झाली.
dhule municipal corporation
dhule municipal corporationesakal
Updated on

Dhule Municipality News : महापालिकेत प्रशासकराज आल्यानंतर झालेल्या पहिल्याच स्थायी समिती सभेत बगीचा, रस्ते, आरोग्यवर्धिनी केंद्रांची दुरुस्ती, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विपश्‍यना केंद्र बांधणे, खुल्या जागेस कंपाउंड वॉल, गटार बांधकाम, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या गणवेशाची शिलाई, वाहनदुरुस्ती आदी सुमारे सव्वापाच कोटी रुपयांची कामे व खर्चास मंजुरी देण्यात आली. (Works worth 5 crores expenditure approved at Dhule Municipality News shm99)

महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २३) सकाळी अकराला महापालिकेच्या (स्व.) अटलबिहारी वाजपेयी सभागृहात स्थायीची सभा झाली. सभेत स्थायी समिती सभेसाठी प्राप्त विविध विषय मांडत त्यांना मंजुरी देण्यात आली.

मंजूर विषयांमध्ये शंभर टक्के शासकीय अनुदानाचे, मूलभूत सेवा-सुविधा विकासअंतर्गत कामांचा प्रामुख्याने समावेश होता.

मंजूर विषय असे

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मनपा हद्दीतील श्री गजानन महाराज मंदिर येथे बगीचा बांधकाम, रस्ते, भिंत, पेव्हरब्लॉक आदी सुशोभीकरण (एक कोटी २४ लाख ९८ हजार १४० रुपये खर्च-निविदाधारक गायत्री कन्स्ट्रक्शन), मनपा मालकीच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या किरकोळ दुरुस्ती तसेच देखभाल-दुरुस्ती (३९ लाख ५५ हजार ३३६ रुपये-सूर्यकांत दीपक महाले)

मूलभूत सेवा-सुविधा विकासअंतर्गत १ ते ६ रस्त्यांचे काँक्रिटीकरण (एक कोटी ४९ लाख ६१ हजार ८१ रुपये- भूषण एल. चौधरी), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानिक विकास योजनेंतर्गत प्रभाग- १ मधील प्रबुद्ध कॉलनीत भूमापन क्रमांक १७/२ ब येथे विपश्‍यना केंद्र बांधणे (४९ लाख ९९ हजार २५६ रुपये- साजिद अली शहा)

dhule municipal corporation
Dhule Municipality News : मालमत्ताकरप्रश्‍नी राजकारणी ‘तोंडघशी’!

मूलभूत सेवा-सुविधा विकास योजनेंतर्गत प्रभाग १९ मध्ये सर्व्हे क्रमांक ४०४ मधील खुल्या जागेस कंपाउंड वॉल (९९ लाख ९९ हजार ६५४ रुपये- ए. के. सैफी), मूलभूत सोयी-सुविधेंतर्गत प्रभाग १९ मधील आविष्कार कॉलनीत चाळीसगाव रोड ते मदरसा अल बाकी यानूस स्वालीयातपर्यंत गटार व आविष्कार कॉलनी गल्ली-१ येथे काँक्रिट रस्ता (४९ लाख ९९ हजार १८७ रुपये-शाहीद अंजुम शकील अहमद)

ड्रेनेज व भूमिगत गटार चोकअप काढण्यासाठी दोन लाख ५७ हजारांचे साहित्य खरेदी, महापालिकेतील चतुर्थ श्रेणी पुरुष कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाईसाठी दोन लाख ६५ हजार ४४० रुपये खर्च, धुळे महापालिकेच्या क्रेडिट रेटिंगसाठी संस्था नियुक्तीचे शुल्क ११ लाख ८९ हजार ४४० रुपये खर्च आदी कामांचा यात समावेश आहे.

ॊत्यांना नोटिसा काढा

सभेदरम्यान लेखाधिकारी गजानन पाटील हजर नसल्याने आयुक्त श्रीमती दगडे-पाटील संतप्त झाल्या. त्यांच्यासह गैरहजर अधिकाऱ्यांना नोटिसा काढा, असा आदेश श्रीमती दगडे-पाटील यांनी दिला. दरम्यान, लेखाधिकारी पाटील नंतर सभेला उपस्थित झाले.

तक्रारी-आरोपांचा पाढा थांबला

एव्हाना स्थायी समिती सभा, महासभेत विषयपत्रिकेवरील विषयांसह इतर विविध समस्या, अडचणींवर तक्रारी, आरोपांचा पाढा पाहायला मिळतो. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे साहजिकच मंगळवारी (ता. २३) स्थायी समिती सभेत सभापती, सदस्य नव्हते.

त्यामुळे तक्रारी, आरोपही ऐकायला मिळाले नाहीत. कोणत्या विषयाला विरोधाचाही प्रश्‍न आला नाही. दरम्यान, २५ जानेवारीला महासभादेखील होणार असल्याने या महासभेतही तक्रारी, आरोपांना जागा नसेल.

dhule municipal corporation
Dhule Municipality News : ‘पांझरे’च्या एकाच पट्ट्यात वर्षानुवर्षे ‘साफसफाई’; 22 टन कचरा संकलित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.