Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व बालमृत्यूविषयी आमदार आमश्या पाडवी विधान परिषदेत निरंतर मुद्दे उपस्थित करीत आहे, तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविक औषधात (अँटिबायोटिक) चक्क अळी खापर (ता. अक्कलकुवा) प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. (Worms emerging in sealed medicines nandurbar news)
खापर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या प्रतिजैविक औषधीमध्ये (अँटिबायोटिक) अळी निघत असल्याची माहिती मिळताच आमदार आमश्या पाडवी यांनी खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन या औषधांची पाहणी केली.
त्यात २१ डिसेंबरला आलेल्या औषधांच्या साठ्यातील बॅच क्र.जी.४२/५०४५ एल्फिन ड्रग्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सिरपमध्ये अळी असल्याचे निदर्शनास आले. २१ डिसेंबरला आलेल्या या औषधाच्या २०० बॉटल साठ्यापैकी ४२ बॉटल वाटप न करता विभक्त करून ठेवण्यात आल्या.
आमदार पाडवी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश वसावे यांना या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याचे सांगितले.
आमदार पाडवी यांनी आपण स्वतः याविषयी उच्चस्तरावर तक्रार करणार असल्याचे सांगितले. युवासेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपसरपंच ललित जाट, ग्रामपंचायत सदस्य शोएब तेली, शिवसेना कार्यकर्ता रवी पाडवी, संतोष पवार आदी उपस्थित होते.
"लहान मुलांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दिल्या जाणाऱ्या एझिथ्रोमायसिन सिरपमध्ये ६ जानेवारीला अळी आढळून येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर सहकारी वैद्यकीय अधिकारी यांनी औषधनिर्माण अधिकाऱ्यांना कळविले. नंतर त्या औषधीचे वाटप तत्काळ थांबविण्यात आले. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून या औषधांसंदर्भात इतर ठिकाणी तक्रार येत असल्याचे पत्र आल्याने एझिथ्रोमायसिन सिरप देणे बंद केले होते." - डॉ. नीलेश वसावे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, खापर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.