Dhule News : बोरीस येथे 9 पासून सती अहिल्यादेवी यात्रोत्सव

बोरीस (ता. धुळे) येथील सती अहिल्यादेवीची यात्रा येत्या ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
Temple and idol of Sati Ahilya Devi
Temple and idol of Sati Ahilya Deviesakal
Updated on

Dhule News : बोरीस (ता. धुळे) येथील सती अहिल्यादेवीची यात्रा येत्या ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे १५ दिवस यात्रा चालते. सती अहिल्यादेवीचे मंदिर खानदेशात प्रसिद्ध असून, बाराही महिने दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी गर्दी असते. दर वर्षी पौष वद्य चतुर्दशीला मोठी यात्रा भरते.

लाखो भाविक दर्शनासाठी येतात. जीवनावश्यक वस्तू, करमणुकीची साधने, सौंदर्यप्रसाधने, मसाले, भांडी, बैलगाडी, उपाहारगृहे आदी विविध स्टॉलची रेलचेल असते. ही यात्रा गावाचेच नव्हे तर परिसराचे चैतन्याचे, वैभवाचे प्रतीक असून, तो एक सांस्कृतिक उत्सवच असतो. (Yatra of Sati Ahilya Devi in ​​Boris is starting from February 9 dhule news)

कर्तन सप्ताह

दर वर्षी यात्रोत्सवापूर्वी पौष वद्य द्वितीयेपासून कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा आहे. यंदाचे हे ५० वे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुभाष देवरे यांच्या हस्ते सप्ताहाचे उद्‍घाटन व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते ग्रंथपूजन झाले.

सती अहिल्यादेवीच्या १९२ व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रा भरत आहे. पौष वद्य १४ शके १८८७ ला सध्याच्या मंदिराच्या जागी मूर्ती बसवून अनेक वर्षे पूजाअर्चा सुरू होती. पुढे मंदिराची प्रसिद्धी वाढल्याने पौष वद्य चतुर्दशीला मोठी गर्दी होऊ लागली.

काही स्टॉल लागले. हळूहळू यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. १५ ऑगस्ट १९५६ ला (कै.) शिवाजी रायमल देवरे (कृषी बाजार समितीचे अध्यक्ष सुभाष देवरे यांचे वडील) यांनी श्री सती अहिल्यादेवी पब्लिक ट्रस्टची स्थापना केली.

Temple and idol of Sati Ahilya Devi
Dhule Water Shortage : जिल्ह्यात 302 गावांसह 39 वाड्यांना टंचाईची झळ!

सती गेलेल्या जागेवरच भव्य मंदिर बांधण्यात आले. दररोज पूजाअर्चा व विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. दिवसेंदिवस गर्दीत वाढच होऊ लागली. यात्रेत पहिल्या दिवशी विरदेलहून बोरीसला माहेरचा आहेर आणला जातो. विरदेलचे नामदेव लोटन पाटील यांच्याकडून बोरीसचे (कै.) भिला सहादू देवरे यांच्याकडे आहेर येतो.

देवीला विरदेलहून आणलेला नैवेद्य दिला जातो. पिढ्यान् पिढ्या ही परंपरा सुरू आहे. मंदिरात नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी असते. वरण-भात, बट्टीचे नैवेद्य दिले जातात. यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे.

यात्रेत जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थांची रेलचेल, करमणुकीची साधने असतात. पण तांब्या-पितळेची भांडी, बैलगाडी, पत्र्याची कपाटे, लोकनाट्य आदींचेही आकर्षण असते. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवरे, सभासद भिला गिरासे, चंद्रकांत जैन, मनोज चौधरी, अमोल देवरे, मंगलाताई देवरे, सुमनताई हिरे, कांतिलाल शिंपी व व्यवस्थापक आनंदा मोरे संयोजन करीत आहेत.

Temple and idol of Sati Ahilya Devi
Dhule Ajit Pawar News : ‘अक्कलपाडा’ धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी प्रयत्न : उपमुख्यमंत्री अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.