Dhule News : बिलाडी येथील तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

mayur patil
mayur patil esakal
Updated on

Dhule News : बिलाडी (ता. धुळे) येथील शेतकरी मयूर प्रकाश पाटील (वय २३) या तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केली. मयूर नियमितप्रमाणे शेतात गेले होते. मात्र, ते घरी न आल्याने घरच्यांनी तपास सुरू केला. (young farmer from Biladi ended their life dhule news)

नीलेश पाटील, नितीन पाटील, मनोज शिंदे आदी त्यांना शोधत शेतात गेले असता त्यांना तेथे मयूर मृतावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी तत्काळ धुळे येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयूर यांना तपासून मृत घोषित केले.

शेतात रोगार या कीटकनाशकाची बाटली पडलेली आढळली. मयूर यांनी विषारी रोगार औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याचे त्यांच्या नातलगांनी सांगितले. घरची परिस्थिती हलाखीची असून, यंदा शेतीतून उत्पन्न येईल या आशेवर असताना तेही आले नाही.

mayur patil
Dhule News : पीडित वसंत पावरा यांची प्रकृती गंभीर; पोलिस अधीक्षक धिवरे यांच्याशी चर्चा

दुसरीकडे शेतीसाठी घेतलेले खासगी व बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत मयूर असायचे, त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, बिलाडी येथे मंगळवारी (ता. ५) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे वडील प्रकाश हिरामण पाटील, भाऊ प्रमोद पाटील, बहीण राणी पाटील असा परिवार आहे.

mayur patil
Dhule News : सिंचन विहीर योजनेतून वगळलेल्या गावांनाही लाभ : आमदार कुणाल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.