नंदुरबार : आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करून छाप पाडणारे आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. आमदार तांबे यांच्या प्रयत्नांतून नंदुरबार शहरात युवा माहिती केंद्रांची स्थापना होणार आहे.
राज्य सरकारने निधी तातडीने मंजूर करावा यासाठी तांबे यांनी पुढाकार घेतला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश मिळाले आहे. (Youth Information Center to be started at Nandurbar MLA Satyajeet Tambes efforts successful Nandurbar News)
या माहिती केंद्रांमध्ये तरुणांच्या आयुष्यातील विविध समस्यांवर तोडगा काढला जाईल. राज्यात तरुणांच्या विकासाला वाहिलेला एकही विभाग नाही, ही बाब आमदार सत्यजित तांबे यांनी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत भाषण करताना अधोरेखित केली होती.
नंदुरबार आदिवासी जिल्हा आहे. येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून, ते क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय यश मिळविण्याची ताकद बाळगून आहेत. इथल्या मुलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले तर हे तरुण नोकरीवर बिसंबून न राहता आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
नंदुरबार जिल्ह्याच्या दोन बाजूंना गुजरात आणि मध्य प्रदेशाची सीमा आहे. इथले तरुण चांगले शिकले किंवा प्रशिक्षित झाले तर त्यांना शेजारील राज्यांमध्येही नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतील.
तोरणमाळ जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. इथे तरुणांना प्रशिक्षण दिले तर स्ट्रॉबेरीची शेती करता येऊ शकते. जिल्ह्यात छोटी-छोटी धरणे आहेत. या धरणांमध्ये मत्स्यशेती, मत्स्यपालन असे उपक्रम तरुणांसाठी सुरू केले जाऊ शकतात. मात्र यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज असून, त्यासाठी सत्यजित तांबे प्रयत्न करीत आहेत.
राज्यात क्रीडा व युवक कल्याण विभाग असला, तरी तरुणांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा कोणताही कार्यक्रम नाही. त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले होते.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
या माहिती केंद्रामध्ये नोकरी, शिक्षण, उच्च शिक्षण आदी गोष्टींबाबत तरुणांना असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची तरतूद असेल. जगभरातील नोकरीच्या किंवा शिक्षणाच्या संधी, त्यासाठी आवश्यक पात्रता, राज्य व केंद्र सरकार यांच्याकडून दिली जाणारी मदत अशा अनेक बाबींची माहिती या केंद्रात घेणे शक्य होईल.
तरुणांना ज्या क्षेत्रात रस आहे, अशा क्षेत्रांची आणि त्यातील संधींची माहितीही या केंद्राद्वारे त्यांना मिळेल. या केंद्रात को-वर्किंग स्पेस, वाचनालय अशा सुविधाही पुरविल्या जातील.
महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. या तरुणांना मदत होईल किंवा त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरविले जाईल, असा एकही विभाग सध्या राज्यात नाही. युवा माहिती केंद्रासारखा उपक्रम ही पोकळी भरून काढेल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.
वाचनालयासाठी निधीची तरतूद
आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे नंदुरबार पालिकेला मिळालेल्या निधीतून वाचनालय/अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासोबतच त्याचे डिजिटायझेशनही करण्यात येईल.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेच्या अभ्यासिकेच्या डिजिटायझेशनसाठी आणि उत्कृष्ट दर्जाच्या पुस्तकांसाठी २० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा विचार करता आतापर्यंत प्रत्येकी जवळपास एक कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.