नंदुरबार : जिल्हा परिषदेचा २०२२-२०२३ या वर्षाचा सुधारित व २०२३-२०२४ या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प (Budget) शुक्रवारी (ता. ३) झालेल्या जिल्हा परिषदेच्या (ZP) विशेष सभेत सादर करण्यात आला. (ZP 2022 23 revised original budget of 2023 24 presented in Zilla Parishad meeting nandurbar news)
त्यात महसुली व भांडवली अशा ७० कोटी ६६ लाख १७ हजार ७७९ रुपयांचा व २८ कोटी ९८ लाख २७ हजार ३७४ रुपयांचे शिल्लकी अंदाजपत्रक अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी सभेत मांडले.
जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत झाली. उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे आदींसह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
या वेळी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी अंदाजपत्रक सादर केले. त्यात त्यांनी नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समित्यासह स्वउत्पन्नाचे जमा व खर्चाचे २०२२-२०२३ चे सुधारित अंदाजपत्रक व २०२३- २०२४ चे मूळ अंदाजपत्रक जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात प्रामुख्याने शासनाकडून उपलब्ध होणारे अनुदान जसे स्थानिक उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान, मुद्रांक शुल्क इत्यादींचा समावेश होतो. तो विचारात घेऊन तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची स्वउत्पन्नाची जमा रक्कम विचारात घेऊन ग्रामीण क्षेत्राच्या समतोल विकासाकरिता निधी उपलब्ध करून देणारे २०२३-२०२४ चे अंदाजपत्रक अर्थ समितीचे सभापती गणेश पराडके यांनी सभेत सादर केले.
जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकासोबत पंचायत समिती वाढीव उपकर अनुदान, घसारा निधी व ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती निधी यांचेही जमा वखर्चाचे सुधारीत व मूळ अंदाजपत्रक सोबत सादर केले आहे.
ग्रामीण भागातील समस्या व जिल्हा परिषदेस प्राप्त होणारे मर्यादित उत्पन्न याचा ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने, जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात तरतुदी उपलब्ध मेळ घालून करून देण्यात आलेल्या आहेत.
जिल्हा परिषद विषय समित्यांचे सभापती, तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या विधायक सूचनांची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे उत्पन्न भविष्यात वाढल्यास त्याचा निश्चित समावेश अंदाजपत्रकात करण्यास कटिबद्ध असल्याचे अर्थ समिती सभापती गणेश पराडके यांनी या वेळी नमूद केले.
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, उपाध्यक्ष सुहास नाईक, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, समाजकल्याण सभापती शंकर पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे अर्थसंकल्प तयार करण्यास सहकार्य लाभले आहे. तसेच वित्त विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी अर्थसंकल्प तयार करण्याच्या दृष्टीने चांगले काम केले आहे. त्याबाबत श्री. पराडके यांनी सर्वांचे आभार मानले.
२०२३-२०२४ चे बचतीचे अंदाजपत्रक
२०२३ - २०२४ चे मूळ अंदाजपत्रक
तपशील महसुली भांडवली एकूण
आरंभीची शिल्लक - ११,१३,९३,२९७ ३२,५४,४२,४५९ ४३,६८,३५,७५६
अंदाजित जमा - ११,३७,८२,०२३ १५,६०,००,००० २६,९७,८२,०२३
एकूण : २२,५१,७५,३२० ४८,१४,४२,४५९ ७०,६६,१७,७७९
संभाव्य खर्च - २२,४५,९०,४०५ १९,२२,००,००० ४१,६७,९०,४०५
अखेरची शिल्लक - ५,८४,९१५ २८,९२,४२,४५९ २८,९८,२७,३७४
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.