भाजपकडून ९९ गुन्हेगारांना तिकीट; अखिलेश यादव यांची खरमरीत टीका

उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून गुन्हेगारांना तिकीट दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Yogi Adityanath, UP
Yogi Adityanath, UPsakal
Updated on

उत्तर प्रदेशमध्ये (UP) सध्या विधानसभा निवडणुकांचे ( Vidhansabha Election) पडघम वाजले असून, सपा आणि भाजपमध्ये जोरदार लढत सुरु असल्याचं दिसतंय. भाजपचे सर्व बडे नेते या निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, दुसरीकडे सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे एकटे लढताना दिसत आहेत. अखिलेश यादव(Akhilesh Yadav) आणि योगी आदित्यनाथ यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता अखिलेश यादव यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (akhilesh yadav criticizes cm yogi adityanath on crime in bjp assembly elections 2022)

Yogi Adityanath, UP
बापूंच्या खादीला विसरलो, पण गुजरातचे सुपूत्र नरेंद्र मोदींनी... : अमित शाह
Yogi Adityanath, UP
गांधी हत्या ते सावरकरांची निर्दोष मुक्तता; जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

उत्तर प्रदेशमध्ये जवळपास सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांची जाहीर केल्या असून, मोजके मतदारसंघ बाकी राहीले आहेत. यावेळी अखिलेश यादव यांनी टीका करताना उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडून गुन्हेगारांना तिकीट दिलं जात असल्याचा आरोप करत आतापर्यंत ९९ गुन्हेगारांना तिकीट दिलं असल्याचं त्यांच्या ट्विटमधून दिसून येतंय. बाबाजींची ब्रेकींग न्युज..भाजपच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांची शंभरी पूर्ण होण्यासाठी एकच जण कमी आहे. आतापर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ९९ उमेदवारांना तिकीट देण्यात आलं असल्याचं ते म्हणाले आहेत.

Yogi Adityanath, UP
आज गांधीजींच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस - PM मोदी

"मुझफ्फरनगर दंगलीत 60 हून अधिक हिंदू मारले गेले आणि 1500 हून अधिक हिंदूंना तुरुंगात टाकण्यात आलं. हीच समाजवादी पक्षाची ओळख आहे. त्यांची टोपी निष्पाप रामभक्तांच्या रक्ताने रंगलेली आहे." अशी जहरी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानं पुन्हा एकदा हिंदु मुस्लीम राजकारणाला सुरूवात झाल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये बोलत असताना त्यांनी सपावर जोरदार निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()