Assembly Election 2022 :बाहुबलींमध्येच टक्कर

१८५ उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद; सर्वपक्षीयांकडून उमेदवारी
Uttar Pradesh Assembly Election
Uttar Pradesh Assembly Electionesakal
Updated on

अयोध्या: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात १२ जिल्ह्यांतील ६१ मतदारसंघांत आज मतदान पार पडले. भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या टप्प्यातील एकूण उमेदवारांपैकी १८५ उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत; तर १४१ उमेदवारांच्या शिरावर अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आले. विशेष म्हणजे यामध्ये अनेक बाहुबलींचा समावेश असून जवळपास सर्वच पक्षांनी गुन्हेगारांना उमेदवारी दिली.

Uttar Pradesh Assembly Election
Ukraine Russia War : 'गंगा' अंतर्गत 24 तासात 4 हजार भारतीय मायदेशी

सत्ताधारी भाजपच्या दृष्टीने पाचवा टप्पा अत्यंत महत्त्वाचा होता. राममंदिर निकालानंतर पहिल्यांदाच अयोध्येत मतदान पार पडले. गेल्या निवडणुकीत भाजपने अयोध्येतील पाचही जागांवर विजय मिळवला होता. यावेळी मात्र त्यांच्यासाठी ही निवडणूक तेवढी सोपी नव्हती. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ६१ जागांपैकी ५० जागा जिंकल्या होत्या, पाच जागांवर समाजवादी पक्ष, तीन जागांवर बहुजन समाज पक्ष, एका जागेवर काँग्रेस, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.

पाचव्या टप्प्यात सिराथू मतदारसंघातून योगी सरकारमधील उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, कुंडा मतदारसंघातून बाहुबली राजा भैय्या, कॅबिनेट मंत्री सिद्धार्थनाथ सिंह अलाहाबाद पश्चिमेतून, भाजपचे खासदार ब्रज भूषण सिंह यांचा मुलगा प्रतीक भूषण गोंडा मतदारसंघातून असे अनेक महत्त्वाचे चेहरे रिंगणात होते.

कौशांबी जिल्ह्यातील सिराथू मतदारसंघ हा या टप्प्यातील सर्वांत महत्त्वाचा मतदारसंघ ठरला. येथून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य निवडणूक लढवत आहेत. मौर्य यांच्याविरोधात अपना दलच्या प्रमुख तथा केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांची बहीण पल्लवी पटेल रिंगणात आहेत. अयोध्येतील गोसाईगंज मतदारसंघातही दोन बाहुबली एकमेकांसमोर ठाकले आहेत. येथे सपच्या वतीने अभय सिंग, तर भाजपच्या वतीने खब्बू तिवारीची पत्नी आरती तिवारी रिंगणात आहे. गेल्या निवडणुकीत खब्बू तिवारी यांचा ११ हजार मतांनी विजयी झाला होता; मात्र आता तो बनावट पदवीप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्याची पत्नी रिंगणात उतरली आहे.

Uttar Pradesh Assembly Election
Russia Ukraine War: सलमानची गर्लफ्रेंड युलिया पुतीनवर चिडली, 'तुम्ही आता...'

कुंडा मतदारसंघातून राजाभैय्या तब्बल सहा वेळा निवडणूक जिंकला. समाजवादीने राजा भैय्याच्या कधीकाळी अत्यंत जवळ असलेल्या गुलशन यादवला तिकीट दिले होते. गुलशनच्या प्रचारासाठी खुद्द अखिलेश यादव यांनी मतदारसंघात रॅलीदेखील केली होती. राजा भैय्या या परिसरातील प्रसिद्ध बाहुबली म्हणून ओळखला जातो. तो तुरुंगात असो किंवा बाहेर, या मतदारसंघातून तो निवडणूक जिंकतोच, असे मतदारसंघातील नागरिक सांगतात. तो सातव्यांदा नशीब आजमावत आहे.

चुरशीची लढत

भाजपच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या टप्प्यात अयोध्या आणि प्रयागराज या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये निवडणूक होत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने अयोध्येत पाचही जागा जिंकल्या होत्या, तर प्रयागराजमध्ये १२ पैकी नऊ. शिवाय अनेक बाहुबली या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com