'बसपा' टिकायला हवा, हा पक्ष संपल्यास लोकशाहीसाठी दुःखद दिवस असेल - ओवैसी

यूपीच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीला एकही जागा मिळालेली नाही.
Owaisi_Mayawati
Owaisi_Mayawati
Updated on

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या निकालानंतर (UP Election Result) अडीचशेच्यावर जागा जिंकत भाजपा (BJP) हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, यामध्ये बहुजन समाज पार्टी (BSP) आणि एमआयएम (AIIMIM) या पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली असून बसपाबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली आहे. बसपाची आजची कामगिरी निश्चित खराब झाली आहे. पण बसपा टिकली पाहिजे ही पार्टी विसर्जित झाल्यास लोकशाहीसाठी दुःखद दिवस असेल अस त्यांनी म्हटलं आहे. (It will be sad day for democracy if Bahujan Samaj Party dissolves says Asaduddin Owaisi)

ओवैसी म्हणाले, "जर बसपा विसर्जित झाली तर हा दिवस लोकशाहीसाठी दुःखद दिवस असेल. बसपाची भारतीय राजकारणात मोठी भूमिका राहिली आहे. मला आशा आहे की हा पक्ष पुन्हा भरारी घेईल. आजच्या निकालावरुन पक्ष कमजोर झाल्याचं दिसतोय पण बसपा टिकणं गरजेचं आहे"

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निकालावर प्रतिक्रिया देताना औवेसी म्हणाले, "यूपीच्या लोकांनी जर भाजपला सत्तेत आणायचं ठरवलंय तर त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मी राज्यातील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे आभार मानतो. आमची मेहनत कमी पडली. पण तरीही आमच्या अपेक्षेप्रमाणं निकाल आलेले नाहीत. पण आम्ही पुन्हा कडक मेहनत करु"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()