Akhilesh Yadav भाजपच्या चक्रव्यूहात अडकणार?

Akhilesh Yadav vs SP Baghel
Akhilesh Yadav vs SP Baghelesakal
Updated on
Summary

'या' जागेवर अखिलेश यांना घेरण्यासाठी भाजपनं चक्रव्यूह निर्माण केलाय.

करहल : मैनपुरी जिल्ह्यातील (Mainpuri District) करहल विधानसभा मतदारसंघात (Karhal Assembly constituency) भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार एसपी सिंह बघेल (SP Singh Baghel) विरुद्ध समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यात मोठी लढत पहायला मिळत आहे. मात्र, जातीय समीकरणाचा विचार केला तर करहल मतदारसंघात सुमारे 3 लाख 70 हजार मतदार आहेत. यात यादव समाजातील मतदारांची संख्या 1 लाख 40 हजारांहून अधिक आहे. तर, 14 हजार मुस्लिम आहेत. याच मतदारसंघात ठाकूर, ब्राह्मण, शाक्य या समाजातील मतदारांची संख्याही दीड लाखाहून अधिक आहे.

या जागेवर अखिलेश यांना घेरण्यासाठी भाजपनं चक्रव्यूह निर्माण केलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यापासून ते गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यापर्यंत या मतदारसंघात दोन मोठ्या रॅली झाल्या आहेत. भाजपचे अनेक बडे नेतेही मतदारांच्या सतत संपर्कात आहेत. भाजप या भागात ज्या पद्धतीनं काम करत आहे, ते पाहून सपा सतर्क झालीय. त्यामुळं समाजवादी पक्षानं अखिलेश यांच्या विजयाची सर्व समीकरणं बदलण्यास सुरुवात केलीय.

Akhilesh Yadav vs SP Baghel
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला धक्का; प्रवक्ते जयराजसिंह यांचा राजीनामा

अखिलेशसाठी मुलायमसिंह यादवही प्रचारात

करहल विधानसभा मतदारसंघात अखिलेश यांचा विजय निश्चित करण्यासाठी संपूर्ण कुटुंब निवडणुकीत गुंतलं असून आज खुद्द मैनपुरीचे खासदार मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) आपल्या मुलाच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत. करहल शहरातील एका पुस्तकाच्या दुकानात उभ्या असलेल्या रोहितला पत्रकारांनी विचारलं, तुला कोणाचा विजय पाहायचाय? यावर तो म्हणाले, मला अखिलेशजींचा विजय बघायला आवडेल, असं त्यानं सांगितलं. तर, अखिलेश यांना करहलमध्ये एवढा प्रचार करण्याची काय गरज? असा सवाल भाजप समर्थक राजेश यांनी उपस्थित केलाय. ते म्हणाले, तुम्ही फक्त विचार करा. एवढे मोठे नेते असताना मग अख्खं कुळ प्रचारात उतरवून का प्रचार करत आहेत. याचा अर्थ इथं काहीतरी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आणि अखिलेश यांच्यावर निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()