Narendra Modi
Narendra ModiNarendra Modi

PM मोदी म्हणाले, कुटुंबवाद्यांच्या राजवटीत काहीही झाले नाही, म्हणून...

Published on

तुमचे प्रत्येक मत उत्तर प्रदेशच्या विकासासाठी डबल इंजिन सरकारला नवी ऊर्जा देईल. तुमचे एक मत कट्टर कुटुंबवाद्यांनाही चोख प्रत्युत्तर देईल. कट्टर कुटुंबवाद्यांनी एवढी दशके या भागाला विकासापासून दूर ठेवले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सोनभद्रानंतर गाझीपूरमध्ये (Ghazipur) आरटीआय मैदानावर आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. कुटुंबवाद्यांनी आपल्या स्वार्थासाठी या पवित्र क्षेत्राची ओळख बदलली आहे. घराणेशाहीच्या राजवटीत येथे माफिया आणि बाहुबलीची ओळख झाली होती. इथे ओळख बदलणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे. अशा लोकांना माफ करू नका. तुम्हाला मतदान करून शिक्षा द्यावी लागेल, असेही पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले.

Narendra Modi
पतीचे उत्पन्न कमी असल्याने पत्नीने केला खून; झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर...

कुटुंबवाद्यांच्या (Familyism) राजवटीत काहीही झाले नाही. त्यांनी आमच्या दलित बंधू-भगिनींच्या वस्त्या जाळल्या होत्या. आमचे एक साथीदार कृष्णानंद राय यांच्यावर गोळ्या झाडल्याचे गाझीपूरचे लोक विसरले नाहीत. दंगलीच्या वेळी उघड्या जीपमधून फिरणारे लोक आज गुडघ्यावर बसले आहेत. पूर्वीच्या सरकारांच्या काळात जी दहशत होती ती आता गरिबांच्या कल्याणाने घेतली आहे, असेही मोदी म्हणाले.

लहान शेतकऱ्यांच्या गरजांकडेही लक्ष

आमचे सरकार लहान शेतकऱ्यांच्या गरजांकडेही लक्ष देत आहे. आज पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत गाझीपूरमधील पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या (farmers) बँक खात्यांमध्ये सुमारे ८५० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. भाजप सरकार यूपीतील १५ कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे. यासाठी देशभरात २ लाख ६० हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

मुलांचे उज्ज्वल भविष्य सर्वतोपरी

देशातील गरीब व नागरिक जाती-जातींमध्ये विखुरले जावेत, जेणे करून त्यांचा खेळ सुरूच राहावा, अशी कट्टर कुटुंबवाद्यांची इच्छा आहे. परंतु, तुम्हाला त्यांना सांगावे लागेल की, तुमच्यासाठी तुमच्या प्रदेशाचा, देशाचा, तुमच्या मुलांचे उज्ज्वल भविष्य सर्वतोपरी आहे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.