'ते' पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची मदत थांबवतील : PM मोदी

PM Modi Criticized samajwadi
PM Modi Criticized samajwadiANI
Updated on

लखनौ : गुन्हेगार कधी आटोक्यात येतील याची कल्पनाही कोणी केली नसेल. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं आहे. आता युपीला दुहेरी गतीने काम करणाऱ्या सरकारची गरज आहे. हे काम फक्त योगींचे दुहेरी इंजिन असलेले सरकारच करू शकतो, असं पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले. पश्चिम उत्तर प्रदेशातील जन चौपाल कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे बोलत होते.

PM Modi Criticized samajwadi
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतले सोनिया, प्रियांका स्टार प्रचारक

आज संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. मानवजातीने 100 वर्षांत जागतिक स्तरावर असे संकट पाहिले नव्हते. या संकटाच्या काळातही, आमच्या डबल इंजिन सरकारमुळे अनेकांना दुहेरी फायदा झाला, असंही मोदी म्हणाले.

या वर्षाच्या सुरुवातीला मी पहिल्यांदा मेरठला भेट दिली. त्यादिवशी वातावरण खराब होतं. त्यामुळे मला रस्तेमार्गानं यावं लागलं. पण, दिल्ली-मरेठ महामार्गामुळे मी हे अंतर एक तासापेक्षाही कमी वेळेत गाठता आलं. या एक्स्प्रेसवेची पायाभरणी करण्याचे भाग्य लोकांनी मला दिले. भाजप सरकार जे म्हणते तेच करते याचा हा पुरावा आहे. उत्तर प्रदेशात स्वातंत्र्यानंतर अनेक निवडणुका झाल्यात. उत्तर प्रदेशने अनेक सरकारे पाहिली. पण, ही निवडणूक सर्वांपेक्षा वेगळी आहे. हे उत्तर प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी, विकासाच्या निरंतरतेसाठी, सुशासनासाठी, उत्तर प्रदेशातील लोकांच्या जलद विकासासाठी आहे, असंही पंतप्रधान म्हणाले.

ते शेतकऱ्यांची मदत थांबवतील -

उत्तर प्रदेशची निवडणूक सुरक्षा, सन्मान आणि समृद्धी राखण्यासाठी आहे. हे मतदान नवीन इतिहास घडवण्यासाठी आहेत. दंगलखोर आणि माफियांना उत्तर प्रदेशावर ताबा मिळवून देणार नाही, असा निर्धार उत्तर प्रदेशच्या जनतेने केला आहे. या मला आनंद आहे. योगींनी यूपीमध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित केले आहे. 21 व्या शतकात, यूपीला अशा सरकारची गरज आहे जी सतत दुहेरी गतीने काम करेल. त्यांना संधी मिळाली तर ते घराणेशाही चालवणारे समाजवादीचे नेते शेतकऱ्यांना मिळणार मदत थांबवतील, अशी टीकाही मोदींनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()