दहशतवाद्यांनी 'सपाची सायकल'च का वापरली? PMमोदींचं अजब विधान चर्चेत

दहशतवाद्यांनी 'सपाची सायकल'च का वापरली? PMमोदींचं अजब विधान चर्चेत
Updated on

लखनऊ: 2008 च्या अहमदाबाद बॉम्बस्फोट खटल्यातील 38 दोषींना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जन्मठेप सुनावल्याचा अभूतपूर्व निकाल अगदी काही दिवसांपूर्वीच देण्यात आला. मात्र, या निकालाच्या दोनच दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी प्रचारसभेत एक विचित्र विधान केलं आहे. हा हल्ला झाला तेंव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी यूपीमध्ये समाजवादी पक्षावर हल्लाबोल करताना म्हटलंय की, त्या दहशवतवाद्यांनी ज्या सायकलवर बॉम्ब पेरले होते, योगायोगाने ते समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्हच होते, याबाबत मला आश्चर्य वाटतं. त्या दहशतवाद्यांनी देखील सायकलचाच वापर केला असल्याचं अजब विधान करत मोदींनी ही टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत..

दहशतवाद्यांनी 'सपाची सायकल'च का वापरली? PMमोदींचं अजब विधान चर्चेत
थांबणं गरजेचं नसलेल्यांनी मायदेशी यावं; युद्धाच्या शक्यतमुळे भारतीयांना सल्ला

काय म्हणाले PM मोदी?

2008 च्या अहमदाबाद बॉम्बस्फोटातील काही बॉम्ब सायकलवर पेरण्यात आले होते, जे सपाचे पक्ष चिन्ह देखील आहे. हे नमूद करून पंतप्रधान पुढे म्हणाले की, "गुजरात बॉम्बस्फोट दोन प्रकारे केले गेले होते. सर्वात आधी 50-60 ठिकाणी स्फोट झाले. पुढे ते म्हणाले की, तुम्ही समाजवादी पक्षाचे (सायकल) निवडणूक चिन्ह पाहिले आहे का? सुरुवातीच्या स्फोटातील सर्व बॉम्ब सायकलवर पेरण्यात आले होते, ज्या ठिकाणी सामान्य लोक किराणा सामान घेण्यासाठी जातात त्याच ठिकाणी हे स्फोट झाले. मला आश्चर्य वाटतं की त्यांनी सायकल का वापरली? असा सवाल त्यांनी केला आहे.

दहशतवाद्यांनी 'सपाची सायकल'च का वापरली? PMमोदींचं अजब विधान चर्चेत
Queen Elizabeth II : ब्रिटनच्या राणीला कोरोनाची लागण

'सपाची सहानुभूती दहशतवाद्यांना'

दुसरीकडे, समाजवादी पक्षाला दहशतवाद्यांची सहानुभूती वाटते, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केला आहे. चौथ्या टप्प्यात मतदानास सामोरे जात असलेल्या लखीमपूर खेरी येथील प्रचारसभेत त्यांनी अहमदाबाद साखळीस्फोटातील आरोपींवरून तोफ डागली. एका आरोपीच्या वडीलांचे सपशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला. अन्य एक दोषी आरोपी आझमगड जिल्ह्यातील संजारपूरचा रहिवासी असल्याचा दावा त्यांनी केला. आझमगड हा अखिलेश यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. सपला या दहशतवाद्यांबाबत सहानुभूती का वाटते, देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा लोकांना जनता पाठिंबा देईल का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राज्य दंगलमुक्त ठेवण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.