मुरादाबादमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना; पुतळ्यावर ओतली काळी शाई

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkaresakal
Updated on
Summary

सवर्ण जातीच्या लोकांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप दलित समाजातील लोकांनी केलाय.

UP Assembly Election 2022 : मुरादाबादमध्ये (Moradabad) चार दिवसांनी मतदान होणार आहे. त्या आधीच काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर (Dr. Babasaheb Ambedkar) काळी शाई ओतून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळं परिस्थिती चिघळण्यापूर्वीच नियंत्रणात आलीय. मुंढापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपुरी गावात (Shivpuri village) ही घटना घडलीय. आज (गुरुवार) सकाळी गावात असलेल्या आंबेडकर पुतळ्यावर काळी शाई पडलेली पाहून लोक संतप्त झाले. गावात राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांनी गोंधळ घालायला सुरू केली. दरम्यान, आंबेडकर पुतळ्यावर (Ambedkar Statue) काळी शाई फेकल्याची माहिती मिळताच एसडीएम प्रशांत कुमार आणि सीओ गणेश गुप्ता घटनास्थळी पोहोचले. या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समजावून सांगत जमाव शांत केला.

दिल्ली-लखनऊ महामार्गाला (Delhi-Lucknow Highway) लागून असलेल्या शिवपुरी गावात ठाकूर आणि दलित समाजाचे लोक एकत्र राहतात. गावात सुमारे 1000 ठाकूर आणि 700 दलित मतदार आहेत. यापूर्वीही दोन समाजात भांडणाच्या घटना घडल्या आहेत. आंबेडकर पुतळ्यावर काळी शाई फेकल्याच्या घटनेत ठाकूर समाजातील 5 जणांची नावं घेऊन गावातील कृपाल, रमेश आदींच्या वतीनं तक्रार देण्यात आलीय. बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला काळी शाई लावून त्यांच्या बोटांची मोडतोड केल्याचा आरोप आहे. ग्रामस्थांनी सांगितलेल्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar
उत्तर प्रदेशात EVM बिघडलं; 'सपा'ची निवडणूक आयोगाकडं धाव

सीओ गुप्ता यांनी सांगितलं की, काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शाई टाकलीय. या प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवून पोलीस या घटनेत सहभागी असलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. सध्या परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात फौजफाटा तैनात करण्यात आलाय. गावातील लोकांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी ठाकूर बंधुभगिनींनी गावाबाहेर स्वागताचा फलक लावला होता. त्यावर 'शिवपुरी गावात आपलं स्वागत' असं लिहिलं होतं. 2 दिवसांपूर्वी या फलकालाही कुणीतरी काळं फासलं होतं, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.