विरोधकांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला टार्गेट केलंय.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) पार्श्वभूमीवर दुसऱ्या फेरीच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (शुक्रवार) कासगंज येथे प्रचारासाठी आले आहेत. पहिल्या टप्प्यात भाजपला प्रचंड बहुमत मिळेल, असा दावा करत पीएम मोदींनी विरोधकांवर निशाणा साधलाय. मोदी म्हणाले, विरोधकांनी आतापासूनच ईव्हीएमवर (EVM Machine) प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केलीय. क्रिकेटमध्ये (Cricket Game) जसं विकेट नाही मिळाली तर गोलंदाज अंपायरवर राग काढतो, तसं विरोधकांनी ईव्हीएमवर राग काढायला सुरुवात केलीय. ईव्हीएमवरच प्रश्न उपस्थित करायचा असेल, तर 10 मार्चनंतर बरेच दिवस बाकी आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पीएम मोदी म्हणाले, काल, यूपीत पहिल्या टप्प्यातील मतदान झालं आहे. लोकांनी मोठ्या संख्येनं बाहेर पडून यूपीच्या विकासासाठी कमळाला मतदान दिलंय. विशेष म्हणजे, आमच्या बहिणी आणि मुलींनी उत्स्फूर्तपणे मतदान केलंय. सध्याच्या कलानुसार पहिल्या टप्प्यात भाजपचा (BJP) झेंडा फडकताना दिसतोय, असं त्यांनी सांगितलं. काल दुपारनंतर सर्व नेत्यांच्या मुलाखती आल्या आहेत, त्यात विरोधी नेत्यांचे चेहरे पडलेले पहायला मिळाले, असा घणाघातही त्यांनी केला.
उत्तर प्रदेशात घराणेशाहीची बोट बुडणार आहे. त्यामुळं विरोधकांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला (Election Commission) टार्गेट केलंय. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, एखाद्यावेळी गोलंदाजाला विकेट मिळत नसेल तर तो अंपायरवर चिडत असतो. तसंच काहीसं या निवडणुकीत पहायला मिळत आहे. समोर हार दिसत असताना विरोधी पक्षांनी ईव्हीएमकडं बोट दाखवायला सुरुवात केलीय; पण काही झालं तरी भाजपचा विजय निश्चित आहे. आता जनता तुम्हाला स्वीकारणार नाही, जनतेला गुंडराज नको आहे, असं सांगत मोदींनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.