भाजपला मोठा धक्का; खासदाराच्या मुलाचा समाजवादी पक्षात जाहीर प्रवेश

mayank joshi joins samajvadi party
mayank joshi joins samajvadi party esakal
Updated on
Summary

मयंक जोशी यांच्या प्रवेशानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh Assembly Election) प्रयागराज येथील भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी (Rita Bahuguna Joshi) यांचा मुलगा मयंक जोशी (Mayank Joshi) यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केलाय. आझमगडच्या गोपालपूर विधानसभेत झालेल्या सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जाहीर सभेत मयंक जोशी यांनी सपाचं सदस्यत्व स्वीकारलंय. अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी आज व्यासपीठावरच मयंक जोशी यांना सदस्यत्व दिलं. मयंक यांच्या प्रवेशामुळं पक्षाला नवी ताकद मिळणार असल्याचं अखिलेश यांनी सांगितलं.

भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या मुलानं सायकलवर स्वार होण्याचा निर्णय घेतला असून आज त्यांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थित समाजवादी पक्षात (SP) जाहीर प्रवेश केलाय. मयंक जोशी यांच्या प्रवेशानं भाजपसाठी (BJP) हा मोठा धक्का मानला जात आहे. मयंक यांच्या आई रिटा यांनी उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार येईल, असा दावा केलाय.

mayank joshi joins samajvadi party
मतदानादरम्यान पोलिसांकडून गोळीबार; तरुणाचा जागीच मृत्यू

प्रयागराजमधील भाजप खासदार रिटा जोशी यांनी मतदानाच्या पाचव्या टप्प्यात प्रयागराजमध्ये (Prayagraj) मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मतदानाबाबत लोकांचा उत्साह 300 च्या पुढं गेलाय. जनतेनं भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतल्यामुळं उत्तर प्रदेशात पुन्हा योगींचं सरकार येणार आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडमध्ये भाजप पुढं असून पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर आम्ही 200 चा टप्पा पार करू, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, मयंक यांच्या समाजवादी पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी बोलणं टाळलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()