UP Election 2022 : दबंग’ मिर्झापूरला आस शांतता, रोजगाराची!

वाराणसी-प्रयागराज या दोन तीर्थस्थळांच्या मध्यावर असलेल्या मिर्झापूरचा इतिहास रक्तरंजित आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh Yadavsakal media
Updated on

मिर्झापूर : `मिर्झापूर` या वेबमालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या व गुंडगिरी, तसेच गरीबीसाठी कुख्यात मिर्झापूर शहराला आता शांतता व रोजगार मिळण्याची आस लागली असल्याचे शहरातून फिरताना दिसते. शहरातील विंध्यांचल माई या देवीच्या मंदिराच्या परिसरातील युवक व त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवरून गुजरातमध्ये जाणाऱ्या युवकांशी चर्चा केल्यानंतरही हीच गोष्ट अधोरेखित झाली.

Akhilesh Yadav
UP Election 2022 : युपी’त भाजप पराभवाच्या वाटेवर

वाराणसी-प्रयागराज या दोन तीर्थस्थळांच्या मध्यावर असलेल्या मिर्झापूरचा इतिहास रक्तरंजित आहे. घरातील पुरुषांनाही संध्याकाळी सहानंतर बाहेर पडल्यास पुन्हा जिवंत घरी परतण्याची शाश्वती नसायची. आता योगी सरकारने गुंडांचा व लॅण्ड माफियांचा सफाया केल्यानंतर परिस्थितीत फरक पडला असल्याचे शहरातील धर्मेश पांडे याने स्पष्ट केले. मिर्झापूरमध्ये पाच विधानसभा मतदारसंघ आहेत व सर्वत्र भाजपचा बोलबाला आहे. शहरात भाजपचे रत्नाकर मिश्रा, सपचे कैलाश चौरासिया, बसपचे राजेश कुमार पांडे यांच्यात मुकाबला आहे. रत्नाकर मिश्रा यांच्याबद्दल लोक चांगलेच बोलताना दिसतात, मात्र सपच्या उमेदवाराबद्दल काही सांगा म्हटल्यावर एका युवकाने, `हम नें उनके खिलाफ कुछ बोला तो तुरंत उठा लेंगे, हम कुछ बात नही करेंगेअसे सांगितले. एकंदरीतच, लोकांना आता अशाप्रकारची गुंडगिरी नको असून, विकास व रोजगार हवा आहे. काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर विध्यांचल माई मंदिराच्या परिसरातही काम सुरू आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. यांपैकी एक तरुण गिरीश पाठक म्हणाला, `अनेक ब्राह्मण कुटुंबांची घरे गेली आहेत, मात्र आम्ही मत भाजपलाच देणार आहोत. हा विकास कधीतरी व्हायलाच हवा होता, तो योगी करत आहेत याचा आम्हाला आनंद आहे.` रेल्वे स्टेशनवर सामान घेऊन गुजरातकडे निघालेल्या मिर्झापूरच्या दोन युवकांची भेट झाली. महेंद्रकुमार बिन हा वापीमधील रासायनिक कारखान्यात नोकरी करतो. तो म्हणतो, `आमचे राज्य आम्हाला नोकरी देत नसल्याने आम्ही खूप नाराज आहोत. राज्यात उद्योगधंदे येऊन विकास झाल्यास आमचा त्रास वाचेल.` अस्लम शेख या त्याच्या मित्रानेही हीच व्यथा मांडली. एकंदरीतच, गुंडगिरी दूर होऊन विकास झाल्यास आम्हाला कुटुंबाबरोबर राहात येईल, असे हे युवक सांगत होते.

Akhilesh Yadav
Uttar Pradesh BJP | उत्तर प्रदेशमध्ये भाजपला आणखी धक्का ! पाहा व्हिडीओ

राज्यातच काम मिळण्याची युवकांची मागणी, विकासकामांना पाठिंबा

योगी हवेत की अखिलेश

हिंदू आणि मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण हा उत्तर प्रदेशातील कायमच कळीचा मुद्दा आहे. मिर्झापूरमधील ब्राह्मण युवक त्याच्या समाजातील लोकांना फक्त भाजपलाच मत द्या, अन्यथा मत वाया जाईल असे सांगत होता, तर त्याचवेळी मुस्लिम मते एकगठ्ठा सपलाच जाणार आहेत, असे तो सांगत होता. मुस्लिमांनी बसप, एमआयएम अशा पर्यायांचा विचार न करता केवळ सपला मतदानाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. या परिस्थितीत भाजपचे कार्यकर्तेही आपल्या मतदारांना इतर उमेदवार कितीही चांगला असला, तरी मत भाजपच्या पारड्यात टाकण्याचे आवाहन करीत आहेत. त्यामुळे योगी-मोदी हवेत की अखिलेश यादव, या प्रश्नाचे उत्तर मतदारांच्या मनात काय आहे, यावर उत्तर प्रदेशचा सत्ताधारी ठरणार असल्याचे स्पष्ट होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()