'अहंकारात उडणारी सायकल...', मौर्य यांचा अखिलेश यादवांवर निशाणा

Keshav Prasad Maurya on Akhilesh Yadav
Keshav Prasad Maurya on Akhilesh YadavGoogle
Updated on

लखनौ : दहशतवाद्यांनी सायकलला पसंती दिली आणि बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सायकलचा वापर व्हायचा, असा अजब तर्क पंतप्रधान मोदींनी लावला होता. तेव्हापासून उत्तर प्रदेश निवडणुकीत (UP Election 2022) सायकलवरून राजकारण तापलंय. आज मतदानाच्या पाचव्या टप्प्यात देखील भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री के. पी. प्रसाद मौर्य (K. P. Prasad Maurya) यांनी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या सायकल या चिन्हावरून निशाणा साधला.

Keshav Prasad Maurya on Akhilesh Yadav
UP Election Poll | पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, 692 उमेदवारांचे देव पाण्यात

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यावेळी केशव प्रसाद मौर्य यांनी मतदान केलं. त्यानंतर ते बोलत होते. अखिलेश यादव यांची अहंकरामध्ये उंच उडणारी सायकल १० मार्चला बंगालच्या उपसागरात जाऊन पडणार आहे. त्यांची सायकल आधी सैफईला गेली होती आणि आता ती बंगालच्या उपसागरात जाईल, असं केशव प्रसाद मौर्य म्हणाले.

मला विश्वास आहे की सिरथूची जनता कमळ फुलवेल आणि सिरथूच्या मुलाला मोठ्या मताधिक्याने विजयी करेल. भाजप सरकार उत्तर प्रदेशातील २४ कोटी जनतेच्या कल्याणासाठी काम करत आहे. म्हणूनच लोकांनी उत्तर प्रदेशात कमळ फुलवायचे ठरवले आहे, असा विश्वासही केशव प्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? -

अहमदाबादमध्ये पहिल्या स्फोटानंतर दुसऱ्या स्फोटात दहशवाद्यांनी समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या सायकलला बॉम्ब बांधून रुग्णालयात स्फोट घडवून आणला होता. त्याचवेळी उत्तर प्रदेशात सपाचे सरकार होते. पाने नेहमीच स्वतःच्या फायद्यासाठी अशी पावले उचलली आहेत. २००६ मध्ये काशीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. संकट मोचन मंदिरातही स्फोट झाला. तेथील कँट रेल्वे स्थानकावरही हल्ला करण्यात आला. २०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तेव्हा या लोकांनी शमीम अहमद नावाच्या आरोपीवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता,” असे आरोप पंतप्रधान मोदींनी केले. हरदोई येथील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.