ठरलं! CM योगींविरोधात 'हा' तगडा उमेदवार निवडणूक लढवणार

Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Updated on
Summary

गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो.

आझाद समाज पक्षाचे (Azad Samaj Party) प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrasekhar Azad) यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election) गोरखपूर शहर (Gorakhpur) मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलीय. चंद्रशेखर यांनी सीएम योगींच्या विरोधात अर्ज दाखल केलाय. या जागेवर समाजवादी पक्षानं (Samajwadi Party) भाजपचे माजी नेते उपेंद्र शुक्ला (Upendra Shukla) यांच्या पत्नी सुभावती यांना तिकीट दिलंय. उमेदवारी अर्ज भरताना चंद्रशेखर यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) सांगितलं की, त्यांच्याविरुद्ध एकूण 16 गुन्हे दाखल आहेत. तर, त्यांच्याकडे 44 लाखांहून अधिक संपत्ती आहे. या संपत्तीत त्यांच्या पत्नीचाही वाटा आहे.

चंद्रशेखर यांनी अलीकडेच सीएम योगी यांच्या विरोधात गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती आणि मंगळवारी त्यांनी उमेदवारी दाखल केली. आझादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एलएलबीपर्यंत शिक्षण घेतल्याचं म्हटलंय. यासोबतच चंद्रशेखर यांच्याकडे 18 हजार रुपये, तर त्यांच्या पत्नीकडं 12 हजार रुपये रोख आहेत. तसेच 26 हजार 369 रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया छुटमलपूरमध्ये (State Bank of India Chhutmalpur), तर 84 हजार 307 रुपये त्यांच्या पत्नीच्या खात्यात आहेत. यासोबतच पत्नीचे पंजाब नॅशनल बँकेत आणखी एक बँक खाते असून या खात्यात 3 लाख 18 हजार 617 रुपये जमा आहेत. चंद्रशेखर यांनी 2015 मध्ये दलित विद्यार्थ्यांची एक संघटना स्थापन केली आणि त्याला 'भीम आर्मी' (Bhim Army) असं नाव दिलं होतं. 2017 मध्ये भीम आर्मी प्रसिद्धीच्या झोतात आली आणि सहारनपूरमध्ये (Saharanpur) राजपूत आणि दलितांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यानंतर चंद्रशेखरला मुख्य आरोपी करण्यात आलं.

Yogi Adityanath
Karnataka : हिजाब वादात आता पाकिस्तानच्या मलालाची उडी

चंद्रशेखरवर 16 गुन्हे दाखल

आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर यांच्यावर विविध जिल्ह्यांत 16 गुन्हे दाखल आहेत. यात सहारनपूरमध्ये आठ, गाझियाबाद, मध्य दिल्ली, दक्षिण पूर्व, हाथरस, अलीगढ, आझमगड आणि लखनऊमध्ये प्रत्येकी एक आणि मुझफ्फरनगरमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. चंद्रशेखरवर खुनाचा प्रयत्न आणि सरकारी मालमत्तेचं नुकसान करण्याचे चार गुन्हे आणि गुन्हेगारी कट रचण्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गोरखपूर हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून ते सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()