लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने आपला गड राखला आहे. मागच्या वेळेपेक्षा कमी जागा आल्या असल्या तरीही निर्विवाद बहुमत भाजपला मिळालं आहे. भाजपाने 255 जागांवर आपली मोहोर उमटवली आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या समाजवादी पक्षाला 111 जागा मिळाल्या आहेत. भाजपला एकूण मतांपैकी 41.29 टक्के मते प्राप्त झाली आहेत. तर समाजवादी पक्षाला 32.03 टक्के आणि बहुजन समाज पक्षाला 12.88 टक्के मते प्राप्त झाली आहे. मात्र, असं असलं तरीही भाजपलाही काही धक्के यावेळी नक्कीच बसलेले आहेत. समाजवादी पक्षाच्या जागा मागच्या वेळेपेक्षा दुप्पट झाला असल्याने ते समाधानी असू शकतात. मात्र, भाजपचे उप-मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासहित राज्यातील 11 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सिराथूमध्ये केशव प्रसाद मौर्य यांना समाजवादी पक्षाच्या डॉक्टर पल्लवी पटेल यांनी 7337 मतांनी पराभूत केलंय.
मंत्री सुरेश राणा हे थानाभवन जागेवरुन राष्ट्रीय लोकदलाच्या अशरफ अली खान यांच्याकडून 10 हजारहून अधिक मतांनी पराभूत झाले आहेत.
बहेडी विधानसभा जागेवरुन राज्यमंत्री छत्रपाल सिंह गंगवार हे सपाच्या अतउर्रहमान यांच्याकडून 3355 मतांनी पराभूत झाले आहेत.
ग्राम विकास मंत्री राजेंद्र प्रताप सिंह हे पट्टी जागेवरुन सपाच्या रामसिंह यांच्याकडून 22051 मतांनी पराभूत झाले आहेत.
राज्यमंत्री चंद्रिका प्रसाद उपाध्याय चित्रकूट जागेवरुन सपाच्या अनिल कुमार यांच्याकडून 20,876 मतांनी पराभूत झाल्या आहेत.
राज्य मंत्री आनंद स्वरुप शुक्ला हे बलिया जिल्ह्यातील बैरिया जागेवर सपाच्या जयप्रकाश अंचल यांच्याकडून 12951 मतांनी पराभूत झाल्या आहेत.
फेफना जागेवरुन क्रीडामंत्री उपेंद्र तिवारी सपाच्या संग्राम सिंह यांच्याकडून 19354 मतांनी पराभूत झाले आहेत.
सपाच्या उषा मौर्य यांनी हुसैनगंज जागेवरुन मंत्री रणवेंद्र सिंह धुन्नी यांना 25181 मतांनी पराभूत केलं आहे.
दिबियापूर जागेवरुन राज्यमंत्री लाखनसिंह राजपूत सपाच्या प्रदीप कुमार यादव यांच्याकडून 473 मतांनी पराभूत झालेत.
सपाच्या प्रसाद पांडेय यांच्याकडून सतीश चंद्र द्विवेदी यांना 1662 मतांनी हरवलं आहे.
गाजीपूर जागेवरुन राज्यमंत्री संगीता बलवंत यांना सपाच्या जयकिशन यांना 1692 मतांनी पराभूत केलंय.
मौर्य आणि सैनी यांचाही पराभव
राजकीय वातावरण बघून भाजपसोडून सायकलवर स्वार झालेले अनेक दिग्गज नेत्यांना देखील यूपीच्या जनतेने नाकारलं आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे योगी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, नंतर सायकलव स्वार होऊनही त्यांना भाजपच्या सुरेंद्र कुशवाहा यांनी मोठ्या फरकाने हरवलं आहे. धर्म सिंह सैनी देखील योगी सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, नंतर सपामध्ये जाऊनही भाजपच्या मुकेश चौधरींनी त्यांना पराभूत केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.