UP Election : योगी मंत्रिमंडळाचा 15 मार्चला होणार शपथविधी?

Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Updated on
Summary

होळीपूर्वी योगी मंत्रिमंडळाचा शपथविधी घेण्याबाबत हायकमांड विचारमंथन करत आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमतानं सत्तेत परतलेलं भाजपचं नवं सरकार (BJP Government) होळीपूर्वी शपथ घेऊ शकतं. योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) इतर सहकाऱ्यांसह होळीच्या सणाआधी 15 मार्च रोजी गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. याशिवाय अन्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेतेही योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीला उपस्थित राहू शकतात.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Election) निकालानंतर योगी मंत्रिमंडळाच्या शपथविधीची चर्चा सुरू झालीय. दरम्यान, योगी आदित्यनाथ इतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत होळीच्या आधी किंवा सणानंतर गोपनीयतेची शपथ घेणार असल्याचं कळतंय. आता योगी आदित्यनाथ 15 मार्चला मंत्रिमंडळासोबत शपथ घेऊ शकतात, असं सांगण्यात येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय पक्षाचे इतर दिग्गजही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भाजपनं 270 जागा जिंकल्या आहेत. 403 सदस्यीय उत्तर प्रदेश विधानसभेत सध्या बहुमतासाठी 202 जागा आवश्यक आहेत, त्या भाजपनं सहज साध्य केल्या आहेत.

Yogi Adityanath
'आप' राष्ट्रीय पक्ष होणार? पक्षाला करावी लागणार आयोगाची 'ही' अट पूर्ण

होळीपूर्वी योगी मंत्रिमंडळाचा शपथविधी घेण्याबाबत पक्षाचे हायकमांड विचारमंथन करत आहे. वास्तविक, होळी 17 आणि 18 मार्चला आहे. त्यानंतर 19 मार्च ही एमएलसी निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अशा स्थितीत होळीपूर्वी शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या चर्चेत 15 मार्च (मंगळवार) या तारखेवर एकमत झाल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.