अखिलेश यांच्यासमोरच जिल्हा अध्यक्षांवर उगारला हात; भरसभेत फुटलं हसू

अखिलेश यांच्यासमोरच जिल्हा अध्यक्षांवर उगारला हात; भरसभेत फुटलं हसू
Updated on

नवी दिल्ली : आगरातील बाह विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) हे प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी मंचावर एक विचित्र घटना घडलेली पहायला मिळाली. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री रामजीलाल सुमन यांनी जिल्हा अध्यक्ष जितेंद्र वर्मा यांना मंचावरच हात उगारल्याचं दिसून आलं. हे पाहून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना देखील आपलं हसू आवरलं नाही. (Uttar Pradesh Assembly Election 2022)

अखिलेश यांच्यासमोरच जिल्हा अध्यक्षांवर उगारला हात; भरसभेत फुटलं हसू
"धर्म संसदेतील वादग्रस्त वक्तव्यांचं समर्थन होऊ शकत नाही"

अखिलेश यादव आगरातील बाह सीटवर प्रचार करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी रामजी सुमन मंचावरुन जनतेला संबोधित करत होते. त्याचवेळी अखिलेश यादव आणि जिल्हा अध्यक्ष जितेंद्र वर्मा आपापसात बोलत होते. ही गोष्ट रामजीलाल यांना आवडली नाही. त्यांनी दोनवेळा जिल्हा अध्यक्षांना आपल्या भाषणादरम्यान इशाराही केला की मध्ये बोलू नका. मात्र, जेंव्हा जितेंद्र वर्मा यांनी अखिलेश यांच्याशी बोलणं थांबवलं नाही तेंव्हा रामजीलाल यांनी माईक सोडून जिल्हा अध्यक्षांजवळ आले आणि त्यांनी हात उगारुन म्हटलं... शांत बसा...

अखिलेश यांच्यासमोरच जिल्हा अध्यक्षांवर उगारला हात; भरसभेत फुटलं हसू
राज्यसभेत लतादीदींना श्रद्धांजली; तासाभरासाठी कामकाज स्थगित

अखिलेशजींना फुटलं हसू

रामजीलाल यांनी हात उगारल्यानंतर जिल्हा अध्यक्ष आमि राष्ट्रीय अध्यक्ष दोघांनाही हसू आलं आणि दोघेही हसू लागले. यानंतर दोघांनीही बोलणं बंद केलं. यानंतर अखिलेश यादव यांनी जनसभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी योगी आदित्यनाथांवर टीका करत शेतकऱ्यांसोबतच युवकांच्या बेरोजगारीवरही भाष्य केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()